AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीय मुलीच्या प्रेमात पडला, पहिल्या पत्नीला तलाख देत निकाह केला; आता..

भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कृत्य होत आहेत. त्यामुळे भारताने सर्व संबंध तोडले आहे. त्यामुळे दोन्ही देशात द्विपक्षीय मालिकाही होत नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय मुलीशी निकाह केल्याची चर्चा पुन्हा समोर आली आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीय मुलीच्या प्रेमात पडला, पहिल्या पत्नीला तलाख देत निकाह केला; आता..
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीय मुलीच्या प्रेमात पडला, पहिल्या पत्नीला तलाख देत निकाह केला; आता..Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 27, 2025 | 6:53 PM
Share

पाकिस्तान देश हा दहशतवादी चालवतात यावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहोर लागली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जसाच तसं उत्तर दिलं. तसेच सर्व संबंध तोडून टाकले आहेत. आता दोन्ही देशात क्रिकेटही खेळलं जात नाही. आयसीसी आणि आशिया स्पर्धेतच भारतीय पाकिस्तानविरुद्ध सामने खेळतो. असं असताना काही वर्षांपूर्वी दोन्ही देशात स्पर्धा होत होत्या. तेव्हा पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू भारतीय मुलीच्या प्रेमात पडला. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून जहीर अब्बास आहे. त्याला पाकिस्तान डॉन ब्रॅडमन म्हणून ओळखलं जात होते. पण भारतीय मुलीच्या प्रेमात इतका आकांत डुबला की त्याने पहिल्या पत्नीला तलाक दिला. तीन मुली असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. तसेच रीता लूथरासोबत निकाह केला. या निकाहासाठी रिताने आपला धर्मही बदलला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर 1988 मध्ये दोघांनी निकाह केला.

जहीर अब्बास आणि रीता लूथरा यांची पहिली भेट इंग्लंडमध्ये झाली होती. त्यावेळेस जहीर इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. ग्लूस्टरशर संघाचा भाग होता. तर रीता लूथर इंटीरियर डिझाईनचा अभ्यास करत होती. रीता आणि जहीरची पहिली भेट झाली त्यातच तो भाळला. त्याने तिच्याशी निकाह करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, जहीर अब्बासचे वडील आणि रीता लूथराचे वडील मित्र होते. रीताचे कुटुंब पहिल्यांदा पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये राहात होते. पण फाळणीनंतर रीताचं कुटुंब भारतात आलं. धर्मांतरानंतर रिताचं नाव समिना झालं. समीना ही एक यशस्वी व्यावसायिक असून कोट्यवधी रुपयांचा इंटीरियर डिझायनिंग व्यवसाय चालवते.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय तरूणींशी निकाह करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय तरूणींशी निकाह केला आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर मोहसिन खान याने बॉलिवूड अभिनेत्री रीन रॉय हिच्याशी विवाह केला होता. तर शोएब मलिकने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत गाठ बांधली होती. पण हे दोन्ही संसार मोडले. नुकतंच वेगवान गोलंदाज हसन अलीने हरियाणाच्या मेवातमध्ये राहणाऱ्या सामिया आरजूशी निकाह केला. दोघांचा संसार सुरु आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.