AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅच हरण्यासाठी मोहम्मद रिझवानला इतके पैसे? टीमला फसवून असा झाला आऊट

Mohammad Rizwan : पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान आशिया कपसाठी निवडल्या गेला नाही. तो CPLमध्ये जबरदस्त कामगिरी बजावले असे वाटत असतानाच तो खरंच खेळण्यासाठी दाखल झाला होता की नोटा छापण्यासाठी असा सवाल विचारण्यात येत आहे.

मॅच हरण्यासाठी मोहम्मद रिझवानला इतके पैसे? टीमला फसवून असा झाला आऊट
मोहम्मद रिझवान
| Updated on: Aug 26, 2025 | 2:14 PM
Share

CPL 2025 : पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने चाहत्यांचा हिरमोड केला. त्याच्यावर चाहते नाराज आहेत. तो एक यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आशिया कप टी 20 साठी काही भरवसा दाखवला नाही. या दुर्लक्षामुळे मोहम्मद रिझवान हा पहिल्यांदाच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) उतरला. सीपीएलमधील सेंट किंट्स अँड नेविस पॅट्रियट्स या संघासोबत त्याने करार केला. पण हा करार सामना जिंकण्यासाठी होता की हारण्यासाठी हे काही समजले नाही. 24 ऑगस्ट रोजी एंटिगा अँड बारबुडा फाल्कंस या संघाविरोधात तरी त्याची कामगिरी अशीच काहीशी दिसली.

रिझवान संघाला फसवून बाहेर

सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने एंटिगा अँड बारबुडा फाल्कंस या संघाविरोधात अगोदर फलंदाजी केली. पण ते 20 षटकात 150 धावा पण करू शकले नाहीत. या संघाने 9 खेळाडू बाद केवळ 133 धाव करू शकले. सेंट किंट्स संघ कदाचित 150 धावांपेक्षा अधिकची खेळी करू शकला असता. पण मोहम्मद रिझवान ढेपाळला. त्यानं संघाला अडकवलं.

ना संघाला जिंकवू शकला ना PCB ला दिले खणखणीत उत्तर

CPL 2025 साठी सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्ससोबत रिझवानने कोट्यवधींचा करार केला होता. त्याचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात तो केवळ 3 धावा काढून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात तरी तो जबरदस्त कामगिरी करेल असे वाटत होते. पण त्याने जी माती खायची ती खाल्लीच. त्याने सेंट किंट्सला विजय मिळवून दिलाच नाही तर दुसरीकडे पीसीबीला आशिया कपमध्ये निवड न केल्याबद्दल खणखणीत उत्तर दिले. रिझवान हा स्फोटक फलंदाजी करणार अशी जोरदार चर्चा होती. पण त्याने सर्वांचे दावे पोकळ असल्याचे सिद्ध केले.

रिझवानने किती केली कमाई

मोहम्मद रिझवान याने एंटीगा अँड बारबुडा फाल्कंसविरोधात 26 चेंडूचा सामना केला. त्यात त्याने केवळ 30 धावा ठोकल्या. सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने त्याच्यासोबत करार केला होता. एका वृत्तानुसार, त्याने भारतीय रुपयात 1.40 कोटी रुपयांचा करार केला होता. पाकिस्तानी चलनात त्याची किंमत 4.51 कोटी रुपये इतकी असल्याचे समोर येत आहे.  चमकदार कामगिरीसाठी त्याला संघात घेतले होते. पण त्याने दोन सामन्यात संघासाठी कोणतीही मोठी कामगिरी बजावली नाही.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.