AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : पंजाब किंग्सने आजही धूतलंय, मुंबईला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय रोहित शर्माच्या अंगलट आल्यासारखं दिसत आहे. पंजाब संघाने मुंबईच्या बॉलर्सना चांगलंच धुतलं आहे.

PBKS vs MI : पंजाब किंग्सने आजही धूतलंय, मुंबईला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान
| Updated on: May 03, 2023 | 10:07 PM
Share

मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय रोहित शर्माच्या अंगलट आल्यासारखं दिसत आहे. पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 215 धावाचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 धावा केल्या. जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली.

मुंबईने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर पंजाबचा कर्णधार शिखर धवन याला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती.  फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली होती. प्रभसिमरन फार काही जास्त टिकला नाही. 9 धावा करून तो माघारी परतला, त्यानंतर शॉर्ट 27 धावा आणि धवन 30 धावा करत बाद झाले.

दोघेही बाद झाल्यावर त्यानंतर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टन आणि जितेश शर्मा यांनी मुंबईच्या बॉलिंगचा क्लास घेतला. लिव्हिंगस्टन याने 42 चेंडूत 82 धावांची खेळी केली, यामध्ये त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. यामधील 3 सिक्सरचा मुंबईचा मेन बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यालातर सलग 3 सिक्स मारले. त्याच्यासह दुसऱ्या बाजूने 27 चेंडूत 49 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकार मारले, अवघ्या 1 धाव त्याचं अर्धशतक करायला कमी पडली.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.