AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS : विराट कोहलीचा कारनामा, पंजाब विरूद्धच्या सामन्यात महारेकॉर्डची बरोबरी

Virat Kohli Milestone : विराट कोहली याला पंजाब विरूद्धच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. विराटने 12 धावांचं योगदान दिलं. मात्र विराटने या 12 धावांच्या खेळीसह इतिहास घडवला आहे.

RCB vs PBKS : विराट कोहलीचा कारनामा, पंजाब विरूद्धच्या सामन्यात महारेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli Rcb Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 11:56 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम फेरीत रुबाबात धडक दिली. आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची ही एकूण चौथी तर 2016 नंतरची पहिली वेळ ठरली. पंजाब किंग्सने आरसीबीसमोर 102 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 10 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आरसीबीने 2 विकेट्स गमावून 106 रन्स केल्या. आरसीबीचा हा या मोसमातील घराबाहेरील आठवा विजय ठरला. आरसीबीच्या या विजयासह अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इतिहास घडवला आहे. विराटने महारेकॉर्डची बरोबरी केली आहे.

विराटने पंजाब विरुद्ध 100 च्या स्ट्राईक रेटने 12 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 चौकार लगावले. विराटने यासह माजी फलंदाज शिखर धवन याच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक चौकार लगावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

शिखर धवन याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 222 सामन्यांमध्ये 6 हजार 769 धावा केल्या. धवनने या खेळीत 152 षटकार आणि 768 चौकार लगावले. तर विराटने 266 सामन्यांमध्ये 768 चौकार पूर्ण केले. विराट यासह सर्वाधिक चौकार लगावणारा संयुक्तरित्या दुसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रजत पाटीदारचा हाच निर्णय निर्णायक ठरला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना झटपट गुंडाळलं. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबच्या एकालाही मोठी खेळी करता आली नाही. पंजाबला जमेतेम 14.1 ओव्हरमध्ये जेमतेम 101 रन्स करता आल्या. त्यानंतर आरसीबीकडून 102 धावांचं आव्हान हे चौघांनीच पूर्ण केलं. विराटच्या 12 धावांचा अपवाद वगळता रजत पाटीदार, मयंक अग्रवाल आणि फिलीप सॉल्ट या तिघांनी विजयात योगदान दिलं.

मयंक अग्रवाल याने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या. तर रजत पाटीदार याने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट हा आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. फिलीपने 27 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 56 रन्स केल्या आणि आरसीबीला चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचवलं.

पंजाबला आणखी एक संधी

दरम्यान पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पंजाब साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राहिली. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत मिळते. त्यानुसार आता पंजाब एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबी विरुद्ध 2 हात करेल. त्यामुळे आता पंजाब दुसऱ्या संधीचं सोनं करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.