IPL 2021: कार्तिक त्यागीने पंजाबच्या तोंडचा घास हिरावला, अखेरच्या षटकात राजस्थानचा रोमहर्षक विजय

एका क्षणी सामना गमावत असलेल्या राजस्थानचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. पण अखेरच्या षटकात राजस्थानचा युवा गोलंदाज कार्तिकने अप्रतिम गोलंदाजी करत संघाला अद्भुत विजय मिळवून दिला.

IPL 2021: कार्तिक त्यागीने पंजाबच्या तोंडचा घास हिरावला, अखेरच्या षटकात राजस्थानचा रोमहर्षक विजय
राजस्थान रॉयल्स संघ
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 12:05 AM

दुबई: आयपीएल या जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीगमध्ये आज (21 सप्टेंबर) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील सामन्यात राजस्थानने रोमहर्षक असा विजय मिळवला आहे. दुबईच्या मैदानात दोन्ही संघानी आयपीएल 2021 (IPL 2021) पर्वाची सुरुवात आजच्या सामन्याने केली होती. एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात चमत्कार व्हावा तशी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावा रोखत कार्तिकने 2 विकेटही घेतले. यासोबतच राजस्थान संघाने विजय मिळवला.

सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. पण राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैसवाल (49) आणि एविन लुईस (36) यांनी उत्तम सुरुवात करत पंजाबचा निर्णय़ चूकीचा असल्याचे भासवले. मात्र अखेरच्या काही षटकात पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) उत्तम गोलंदाजी करत 5 विकेट मिळवले आणि राजस्थानला 185 धावांवर रोखलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाकडून सलामीवीर मयांक अगरवाल (66) आणि केएल राहुल (49) यांनी शतकी भागिदारीने संघाला विजयाजवळ नेलं.  त्यानंतर पुरन आणि मार्करम यांनी देखील उर्वरीत जबाबदारी पार पाडली. पण अखेरच्या षटकात राजस्थानचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावांपैकी दोनच धावा देत दोन धावांनी राजस्थानला विजय मिळवून दिला.

कार्तिकचा चमत्कार, राजस्थानचा विजय

पंजाबसमोर 186 धावांचे मोठे लक्ष्य होते. पण सुरुवातीलाच सलामीवीर मयांक आणि राहुलने शतकी भागिदारी करत संघाला विजय अगदी सोपा केला. त्यानंतर पूरननेही देखील बऱ्यापैकी उर्वरीत जबाबदारी पार पाडली. पण अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी केवळ चार धावांची गरज असताना अक्षरश: चमत्कार घडला. गोलंदाजीला आलेला नवखा गोलंदाज कार्तिक त्यागीने संघाला चमत्कारीक असा विजय मिळवून दिला. त्याने  पहिला चेंडू मार्करमला डॉट खेळवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मार्करमने एक धाव घेतली. आता विजयासाठी 3 धावा हव्या होत्या आणि समोर पूरन सारखा सेट फलंदाज होता. पण त्याच बोलवर त्यागीने पूरनला संजूच्या हाती झेलबाद करवलं आणि सामन्याला नवं वळण दिलं. त्यानंतर चौथा चेंडू दीपक हुडाला डॉट खेळवत पाचव्या चेंडूवर त्यालाही पूरनप्रमाणे बाद करवलं. ज्यानंतर अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना नवा आलेला फलंदाज फॅब अॅलनला डॉट बॉल टाकत त्यागीने राजस्थानला विजय मिळवून दिला.

अर्शदीपचा ‘पंच’

पंजाबला सामना गमवावा लागला असला तरी त्याचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने आजच्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत तब्बल 5 विकेट खिशात घातले. त्याने संघाला सर्वात पहिलं यश मिळवून देत एविन लुईसला बाद केलं. त्यानंतर महत्त्वाचे असे लियम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर यांच्या विकेट घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं. अखेर शेवटच्या षटकात साकरिया आणि कार्तिक त्यागी यांना बाद करत त्याने एका सामन्यात पाच विकेट्स मिळवण्याचा सन्मान स्वत:च्या नावे केला.

‘अनलकी’ यशस्वी!

सामन्यात राजस्थान संघाला उत्तम सुरुवात करुन देणारा फलंदाज यशस्वीला त्याच अर्धशतक मात्र पूर्ण करता आलं नाही. अवघ्या एका धावेने यशस्वीचं अर्धशतक हुकलं. सुरुवातीपासून अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या यशस्वीला अर्धशतकाच्या जवळ पोहचताच  काहीशी अडचण येत असल्याचं दिसून येत होतं. इतक्या मोठ्या स्पर्धेत अवघ्या 19 वर्षीय यशस्वीला अर्धशतकाजवळ पोहचताच दडपण येणं स्वाभाविक होतं. याच दडपणामुळे हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर तो चूकीचा शॉट खेळून बसला आणि मयांकने त्याचा झेल घेतला. यशस्वीने 36 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकतं 49 धावा केल्या.

हे ही वाचा

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

वीरेंद्र सेहवागने उधळली स्तुतीसुमने, एमएस धोनीचा केला उदो उदो, म्हणाला…

(PBKS vs RR Live match Rajstan royals beat Punjab Kings with two runs with kartik tyagis awsome bowling )

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.