ENG vs IND : टीम इंडियाने विजयाचा गोल्डन चान्स गमावला, लीड्समधील पराभवाची 5 प्रमुख कारणं

England vs India 1st Test Analysis : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या मोजक्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. मात्र इतरांनी या खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरलं. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

ENG vs IND : टीम इंडियाने विजयाचा गोल्डन चान्स गमावला, लीड्समधील पराभवाची 5 प्रमुख कारणं
Shubman Gill Team India Captain
Image Credit source: Alex Davidson/Getty Images
| Updated on: Jun 29, 2025 | 12:00 AM

भारतीय कसोटी संघाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळवण्यात आलेला सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं होतं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. तर पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने 350 धावा करत विजय साकारला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून होणार आहे. शुबमन गिल याच्या कसोटी कारकीर्दीतील कर्णधार म्हणून हा पहिला सामना होता. शुबमनला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला विजयी करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाने अनेक संधी गमावल्या. त्यामुळे सामना इंग्लंडने जिंकला. भारताकडून या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाच्या टॉप फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मात्र या सामन्यातील काही चुकांमुळे भारताने इंग्लंडला विजयी होण्यास मदत केली, असं म्हटलं...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा