कसोटी मालिकेदरम्यान Team Indiaचा रविवारी 50 षटकांचा सामना, रोहित शर्मा कॅप्टन, Bcciची घोषणा
Indian Cricket Team : टीम इंडिया रविवारी 30 नोव्हेंबरला 50 ओव्हरची मॅच खेळणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा 6 ते 10 डिसेंबर दरम्यान एडलेड ओव्हल येथे होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. तसेच हा सामना डे नाईट असणार आहे. त्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. मात्र या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया 50 षटकांचा सामना खेळणार आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
दुसरा कसोटी सामना हा दिवस रात्र असणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा सराव व्हावा, या उद्देशाने टीम इंडिया विरुद्ध प्राईम मिनिस्टर ईलेव्हन यांच्यात कॅनबेरामध्ये 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अशा 2 दिवसी सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र सामन्यातील पहिलाच दिवस हा पावसामुळे वाया गेला. या सामन्याचं आयोजन हे मानुका ओव्हल येथे करण्यात आलंय. मात्र तिथे 30 नोव्हेंबरला तुफान पाऊस झाला. त्यामुळे टॉसही होऊ शकला नाही. अनेक तास पाऊस थांबवण्याची प्रतिक्षा केली. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ नाईलाजाने रद्द करण्यात आला.
त्यामुळे आता दोन्ही संघांना दुसर्या सामन्यातील सरावासाठी फक्त 1 दिवसच मिळणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी अर्थात 1 डिसेंबरला दोन्ही संघांमध्ये 50 षटकांचा सामना होणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. दोन्ही संघ 50 षटकं खेळण्यासाठी तयार असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे. तसेच या सामन्याला सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 8 वाजून 40 मिनिटांनी टॉस होणार आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी, रविवारी 50 षटकांचा सामना
Update: PM’s XI v India – Manuka Oval
Play has been abandoned for Day 1 and will resume tomorrow (Sunday) at 9:10 am IST. Coin toss will be at 8:40 am IST.
Teams have agreed to play 50 overs per side.#TeamIndia pic.twitter.com/qb56K8dtX0
— BCCI (@BCCI) November 30, 2024
प्राईम मिनिस्टर ईलेव्हन टीम : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), सॅम हार्पर (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर आणि जेम रायन.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप , हर्षित राणा , सर्फराज खान, अभिमन्यू इसवरन आणि देवदत्त पडिक्कल.