Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार

Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार

अनुभवी धवल कुलकर्णी मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मोहित अवस्थी, शाम मुलानी, शशांक आतर्डे, अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरचीही मुंबई संघात निवड करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 29, 2021 | 9:46 PM

मुंबई: आगामी रणजी करंडक स्पर्धेत मोसमातील पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या कर्णधारपदी सलामीवीर पृथ्वी शॉ ची निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच कसोटी सामन्यात 339 धावा केल्या आहेत. यामध्ये पदार्पणाच्यावेळी झळकावलेल्या एका शतकाचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ ने 2414 धावा केल्या असून यात नऊ शतकांचा समावेश आहे. (Prithvi Shaw named Mumbai captain for first 2 matches of Ranji Trophy Arjun Tendulkar Shivam Dube picked)

“पृथ्वी उत्तम कर्णधार आहे. सुंदर सलामीवीर आहे. तुम्हाला अजून काय हवं” असं मुंबईच्या निवड समितीचे प्रमुख सलील अंकोला म्हणाले. यशस्वी जैस्वाल, सरफराझ खान, अरमान जाफर आणि आकर्षित गोमेल यांची देखील 20 सदस्यीय संघात निवड झाली आहे.

अनुभवी धवल कुलकर्णी मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मोहित अवस्थी, शाम मुलानी, शशांक आतर्डे, अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरचीही मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. 41 वेळा रणजीचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईचा ग्रुप सी मध्ये नऊ एलिट संघात समावेश करण्यात आलाय. 13 जानेवारी महाराष्ट्रा विरुद्धच्या सामन्याने मुंबई आपले अभियान सुरु करणार आहे. कोलकातामध्ये 20 जानेवारीपासून दिल्ली विरुद्ध सामना खेळतील.

मुंबईचा संघ: पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराझ खान, सचिन यादव, आदित्य तरे (विकेटकिपर), हार्दिक तामोरी (विकेटकिपर), शिवम दुबे, अमान खान, शाम्स मुलन, तांशू कोटीयन, प्रशांत सोळंकी, सशांत आतर्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बादियनी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर

संबंधित बातम्या:

TRAIN FARE: एक रुट, दोन भाडे; रेल्वेचं तिकीट नेमकं ठरतं कसं?
Mumbai | आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन
Corona | नियम कडक, पण पाळतंय कोण? APMCमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केट बंद करावं लागणार?

(Prithvi Shaw named Mumbai captain for first 2 matches of Ranji Trophy Arjun Tendulkar Shivam Dube picked)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें