TRAIN FARE: एक रुट, दोन भाडे; रेल्वेचं तिकीट नेमकं ठरतं कसं?

TRAIN FARE: एक रुट, दोन भाडे; रेल्वेचं तिकीट नेमकं ठरतं कसं?
संग्रहित छायाचित्र.

रेल्वेचे भाडे रेल्वेच्या प्रकारावर अधिक अवलंबून असते. तुम्ही कोणत्या रेल्वेनं प्रवास करतात त्यानुसार रेल्वेचे भाडे ठरते. सबअर्बन रेल्वे, एक्स्प्रेस, एसी सर्व्हिस यांसारख्या रेल्वे समाविष्ट आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 29, 2021 | 9:12 PM

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेद्वारे देशाची सर्व टोकं जोडली गेली आहेत. सर्व वर्गातील नागरिक रेल्वे सेवेचा लाभ घेतात. भारतीय रेल्वेद्वारे विभिन्न प्रकारच्या रेल्वे धावतात. रेल्वेमध्ये विविध प्रकारचे डब्बे असतात. त्यानुसार रेल्वेच्या भाड्यात बदल होतो. स्लीपरमध्ये कमी तर एसीमध्ये अधिक भाडे आकारले जाते. सुविधांनुसार भाडे दरात कमी-अधिक प्रमाण दिसून येते. मात्र, एकाच मार्गाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी वेगळा दर आकारला जातो. रेल्वे भाडे ठरविण्याच्या पद्धती विभिन्न आहेत. रेल्वे भाड्यांत काही अंतर्गत शुल्कांचा देखील समावेश होतो.

रेल्वे भाडे ठरविण्याचे निकष?

– रेल्वेचे भाडे रेल्वेच्या प्रकारावर अधिक अवलंबून असते. तुम्ही कोणत्या रेल्वेनं प्रवास करतात त्यानुसार रेल्वेचे भाडे ठरते. सबअर्बन रेल्वे, एक्स्प्रेस, एसी सर्व्हिस यांसारख्या रेल्वे समाविष्ट आहेत. या गाड्यांसाठी भाडे ठरविण्याची पद्धत सर्वसामान्य पद्धतीपेक्षा विभिन्न आहे. विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गरीब रथ, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, स्पेशल ट्रेन यांचा समावेश होतो.

– किलोमीटरच्या आधारावर देखील रेल्वे भाड्याची निश्चिती केली जाते.

– रेल्वेच्या प्रकारनिहाय विविध शुल्क देखील आकारले जातात. रिझर्व्हेशन शुल्क, केंद्रीय कर, किमान भाडे, किमान अंतर शुल्क यांचा देखील समावेश होतो. या सर्वांच्या एकत्रिकरणातून रेल्वेचा तिकीट दर ठरविला जातो.

– विशिष्ट प्रकारचे शुल्क केवळ विशिष्ट रेल्वेसाठीच लागू असतात.

तिकीट कसं ठरतं?

रेल्वे तिकीटात समाविष्ट असणाऱ्या शुल्कात किलोमीटरनुसार फरक जाणवतो. किलोमीटरची श्रेणी 1-5 किलोमीटर, 6-10, 11-15, 16-20, 21-25 पासून 4951-5000 पर्यंत समाविष्ट आहे. तुमचा प्रवास ज्या श्रेणीत समाविष्ट असेल त्यानुसार शुल्काची आकारणी केली जाईल.

तत्काळ तिकीटासाठी स्वतंत्र रचना?

तुम्ही तत्काळ तिकिट खरेदी केल्यास तुम्हाला स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. किलोमीटरच्या आधारावर शुल्क निश्चित केले जाते. अन्य शुल्कासोबत एकत्रित करुन अंतिम तिकिटाचा दर निश्चित केला जातो.

संबंधित बातम्या:

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….
177 कोटींची रोकड घरात ठेवणारा पीयूष जैन सहीसलामत सुटणार?, अखिलेश म्हणतात, चुकून भाजपच्याच माणसावर छापेमारी
Mumbai | आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें