AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

177 कोटींची रोकड घरात ठेवणारा पीयूष जैन सहीसलामत सुटणार?, अखिलेश म्हणतात, चुकून भाजपच्याच माणसावर छापेमारी

पीयूष जैन सध्या कानपूरच्या जिल्हा तुरुंगात आहे. त्याला 15 नंबरची खोली दिली आहे. तो सध्या तणावात असल्याचे समजते. त्यामुळे तो कोणाशीही बोलत नाही. कशाची मागणीही करत नाही.

177 कोटींची रोकड घरात ठेवणारा पीयूष जैन सहीसलामत सुटणार?, अखिलेश म्हणतात, चुकून भाजपच्याच माणसावर छापेमारी
पीयूष जैन.
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 5:37 PM
Share

कानपूरः आता तुमचं डोकं भंडावून सोडणारी बातमी. तब्बल 177 कोटींची रोख रक्कम ज्याच्या घरात सापडली, तो कानपूरचा अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या छापेमारीप्रकरणाला आता एक नवीच कलाटणी मिळालीय. भाजपने चुकून आपल्याच व्यक्तीवर छापा मारल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पीयूष जैनचा आजपर्यंत तरी समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ पम्पी यांच्याशी काहीही संबंध असल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच एका वेगळ्याच पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न सुरूय. कसे, ते तुम्हीच वाचाच…

इथे मुरते पाणी

कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैनकडे डोळे विस्फारावेत इतकी रोकड आणि मालमत्ता सापडली. एकूण रक्कम जवळपास पावणेदोनशे कोटींची. मात्र, आता अहमदाबादच्या जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ही टर्नओव्हरची रक्कम असल्याचे कोर्टात म्हटले आहे. त्याची कागदपत्रेही सादर केली आहेत. त्यामुळे या अत्यंत गवगवा झालेल्या कारवाईतली हवाच त्यांनी काढून टाकलीय. हे सारे मुद्दामहून करत हा खटलाच अधिकाऱ्यांनी कमकुवत केला आहे, असा दावा आता कर विषयाचे तज्ज्ञ करत आहेत.

आता काय होऊ शकते?

कर विभागाने पीयूष जैनची मालमत्ता जर त्याच्या व्यवसायाच्या टर्न ओव्हर मानला, तर तो फक्त दंडाची रक्कम भरून याप्रकरणातून सुटू शकतो. तशी तजबीज केल्याची शक्यताच वर्तवली जात आहे. त्यामुळे आयकर विभागही काळापैसा प्रकरणी कारवाई करू शकणार नाही. पीयूष जैनची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या 177 कोटीच्या रकमेवर कर भरला नसल्याचे कबूल केले आहे. त्यात 31.50 कोटीची करचोरी केल्याचे म्हटले आहे. कराचा दंड आणि व्याजासहीत ही रक्कम 52 कोटी होते. त्यामुळे ती रक्कम भरून तो सहज सुटू शकतो.

दोघांचा उद्योग सारखा

समजावादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन आणि पीयूष जैन यांच्यात कसलेही संबंध नसल्याचेही उघड झाले आहे. दोघांचा उद्योगही सारखाच आहे. मात्र, त्यांचा कारभार वेगवेगळा आहे. आतापर्यंत भाजप ज्याचा संबंध समाजवादी पक्षाशी जोडायचे, तो तसा नाही. त्यामुळे या मुद्दावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. खरे तर पीयूष जैन हा समाजवादी पक्षाचा म्हणून त्याच्यावर कारवाई केली. मात्र, हा भाजपचाच माणूस निघाला, असा आरोप त्यांनी केला आहे.

रात्र जागून काढली

पीयूष जैन सध्या कानपूरच्या जिल्हा तुरुंगात आहे. त्याला 15 नंबरची खोली दिली आहे. तो सध्या तणावात असल्याचे समजते. त्यामुळे तो कोणाशीही बोलत नाही. कशाची मागणीही करत नाही. त्याने पहिली रात्र तर जागून काढल्याचे समजते.

इतर बातम्याः

आले मुख्यमंत्र्यांच्या मना, तिथे पेट्रोल स्वस्ताईचा जमाना, झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, अटी लागू

Narayan Rane | जिच्यामुळे सिंधुदुर्गात राडा सुरु आहे, त्या जिल्हा बँकेला इतकं महत्त्वं का आलं? वाचा सविस्तर

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.