
दक्षिण आफ्रिकेला चोकर्स का म्हणतात, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात डी ग्रुपमधील नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. नेदरलँड्सने झुंज देत 103 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 104 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी टीमला अफलातून सुरुवात करुन दिली. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरची हवाच काढली. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 12 धावांवर 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच बॉलपासून विकेट गमावण्याची सुरुवात केली. क्विंटन डी कॉक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एकही बॉल न खेळता रन आऊट झाला. एकही बॉल न खेळता आऊट होणाला ‘डायमंड डक’ असं म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये वान बीक याने रीझा हेंड्रिक्स याला क्लिन बोल्ड केलं. रीझा 3 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये व्हिव्हियन किंगमा याने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम याला इिरोवर आऊट केलं. नेदरलँड्सचा विकेटकीपर कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने अफलातून झेल घेतला. एडन मारक्रम यालाही भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 3 अशी नाजूक स्थिती झाली. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये किंगमाने दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला. किंगमाने हेन्रिक क्लासेनला 4 धावांवर टीम प्रिंगल याच्या हाती कॅच आऊट केलं. टीमने अप्रतिम कॅच घेतला.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेची पावरप्लेमध्ये नेदरलँड्सपेक्षा दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळाली. नेदरलँड्सने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 20 धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सच्या तुलनेत 4 धावा कमी आणि 1 विकेट जास्त गमावली. दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स गमावून 16 धावा केल्या.
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन: स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन आणि व्हिव्हियन किंगमा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.