Retired out: अश्विनच्या रिटायर्ड आऊट होण्याबाबत कोच संगकारा आणि अश्विनने मौन सोडलं, म्हणाले…

| Updated on: Apr 12, 2022 | 1:08 PM

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) रिटायर्ड आऊट (Retired out) होण्याचा निर्णय घेतला होता.

Retired out: अश्विनच्या रिटायर्ड आऊट होण्याबाबत कोच संगकारा आणि अश्विनने मौन सोडलं, म्हणाले...
R Ashwin
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) रिटायर्ड आऊट (Retired out) होण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या खेळीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. रियान परागने फलंदाजीसाठी यावं आणि वेगाने धावा काढता याव्यात म्हणून अश्विनने 19 व्या षटकात रिटायर्ड आऊट होऊन माघारी परतण्याचा निर्णय घेतला होता. परागने नंतर चार चेंडूत आठ धावा केल्या, ज्या धावा पुढे सामन्यात निर्णायक ठरल्या. राजस्थान रॉयल्सने हा सामना तीन धावांनी जिंकला. याबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, हा निर्णय क्षणार्धात घेतला होता. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पण ही वस्तुस्थिती अनेकदा विस्मरणात जाते. अश्विनने या सामन्यात 23 चेंडूत 28 धावा केल्या होत्या ज्यात दोन षटकारांचा समावेश होता.

अश्विनने फुटबॉलचे उदाहरण देऊन रिटायर्ड आऊट झाल्याचे स्पष्ट केले, त्याने क्रिकबझला सांगितले, ‘ क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, ही गोष्ट आपण अनेकदा विसरतो. पण हा खेळाचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचा आपण अजून विचार केलेला नाही. टी-20 मध्ये संघ खूप महत्त्वाचा आहे. हे एक प्रकारे फुटबॉलसारखे आहे. गोल करणारा हा सलामीचा फलंदाज किंवा विकेट घेणाऱ्यासारखा असतो. परंतु या गोष्टीला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा तुमचा गोलकीपर किंवा बचावपटूही (डिफेंडर) त्यांची भूमिका बजावतात.

संगकारा म्हणाला… आधीच बोलणं झालं होतं

राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक कुमार संगकारा याने हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले होते. तो म्हणाला होता, “हे करण्याची (रिटायर्ड आउट) हीच योग्य वेळ होती. अश्विनने स्वतः हा निर्णय घेतला. आपण काय करावे याबद्दल आधी चर्चा केली होती. प्रशिक्षक म्हणून मी एक चूक केली ती म्हणजे मी रियान परागला रेसी व्हॅन डर डुसेनच्या आधी पाठवले नाही. यामुळे आम्ही परागचा पुरेपूर फायदा घेऊ शकलो नाही. मात्र अश्विनने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. संघाच्या हितासाठी त्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले आणि नंतर शानदार गोलंदाजी केली.”

रिटायर्ड आउट नियमानुसार

रिटायर्ड आउट होण्याची घटना आयपीएलमध्ये यापूर्वी कधीही घडली नव्हती. पण अश्विनचं हे पाऊल खेळाच्या नियमांतर्गत येते. मेरिलबॉन क्रिकेट क्लबने (क्रिकेटची कायदा बनवणारी संस्था) सांगितले की, नियम 25.4.1 सांगतो की, फलंदाज कधीही निवृत्त (रिटायर्ड आउट) होऊ शकतो. नियम 25.4.3 मध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा एखादा फलंदाज कोणतीही दुखापत या आजाराशिवाय रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो फलंदाज नंतर विरोधी संघाच्या कर्णधाराच्या संमतीशिवाय परत फलंदाजीसाठी येऊ शकत नाही.

इतर बातम्या

SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?

Hardik pandya SRH vs GT: कानाजवळ उमरानचा बाऊन्सर शेकला, त्यानंतर हार्दिकने बॅटनेच दिलं प्रत्युत्तर, एक रेकॉर्डही बनवला

SRH vs GT IPL 2022: अविश्वसनीय! शुभमन गिल तरी काय करणार? राहुलने कव्हर्समध्ये घेतलेला फ्लाईंग कॅच एकदा पहाच VIDEO