
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही भारताने निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडवलं. भारताने दुसरा वनडे सामना 2 विकेटने गमावला. या सामन्या भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 264 धावा केल्या. मात्र या धावा खूपच कमी असल्याचं बोललं जात होतं. गोलंदाजांनी धावा रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र 46.2 षटकात ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य गाठलं. या विजयी धावसंख्येत 20-25 धावा अधिक असत्या तर कदाचित भारताने हा सामना जिंकला असता अशी चर्चा रंगली आहे. असं असताना विराट कोहलीचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. कारण विराट कोहली दोन्ही वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेट आर अश्विन याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच काय तर विराट कोहलीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
आर अश्विनने एडिलेड येथे पार पडलेल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर ही पोस्ट केली आहे. यात राइटचं चिन्ह दिलं आहे आणि तिरंगी रंगात हे चिन्ह रंगवलेलं आहे. त्याच्या खाली त्याने जस्ट लीव्ह इट असा मेसेज लिहिला आहे. म्हणाजेच आता सोडून द्या. . क्रीडाप्रेमी या पोस्टचा थेट अर्थ आता विराट कोहलीशी जुळवत आहेत. अश्विनच्या या ट्वीटनंतर नेटकरी त्याच्याखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं की, तुम्ही जे काही लिहिलं आहे ते विराट कोहलीसाठी आहे का? तुम्ही विराट कोहलीला निवृत्ती घेण्यास सांगत आहात का? दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, अश्विनने विराट कोहलीला थेट संदेश दिला आहे की क्रिकेट तुला सोडण्यापूर्वी तू क्रिकेटला सोड.
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) October 23, 2025
Leave the Cricket before Cricket Leaves You?? Ashwin message for Kohli is clear
— Sunny™️ (@lengletszn) October 23, 2025
विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर आता फक्त वनडे क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन्ही सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. पर्थमध्ये 8 चेंडूचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विकेटच्या मागे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एडिलेडमध्ये झेव्हियर बार्टलेटच्या आत येणाऱ्या चेंडूवर पायचीत झाला. विराट कोहली 2012 नंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच एलबीडब्ल्यू बाद झाला. बाद झाल्यानंतर त्याचे हावभाव बरंच काही सांगून जात होते. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यानंतर क्रिकेटला रामराम ठोकेल अशीही चर्चा रंगली आहे.