
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 70व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून टॉप 2 मध्ये एन्ट्री घेतली. पण या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या दिग्वेश राठीने लक्ष वेधून घेतलं. आरसीबी विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी त्याने नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या जितेश शर्माला मंकडिंग पद्धतीने बाद केलं. यानंतर त्याने अपील केली पण कर्णधार ऋषभ पंतने अपील मागे घेण्यास भाग पाडलं. कर्णधार ऋषभ पंतच्या या कृतीचे काही जण कौतुक करत आहेत. पण आयसीसीच्या नियमांनुसार, मंकडिंग धावबाद होऊ शकतो. इथे सगळं नियमांनुसार घडलं. यावेळी गोलंदाजाला आधार देणे हे कर्णधाराचे कर्तव्य असतं. खेळ भावनेच्या नावाखाली सर्वांसमोर एखाद्याचा अपमान करणे किती योग्य आहे असा प्रश्न माजी क्रिकेटपटू आर अश्विनने उपस्थित केला आहे. लाखो लोकांसमोर एका तरुण खेळाडूची बदनामी केली, हे सगळं थांबवा. आपण इतरांसोबत असे करतो का? गोलंदाज तुम्हाला लहान का वाटतो? अश्विनने ऋषभ पंतच्या या कृतीवर टीका केली.
दिग्वेश राठीच्या मंकडिंग रनआउट प्रकरणावर आर अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त झाला. आर अश्विनने म्हटले आहे की, “दिग्वेश राठी माझा नातेवाईक नाही, तो कोण आहे हे मला माहित नाही. पण मला असे म्हणायचे आहे की ऋषभ पंतने घेतलेल्या निर्णयाचा गोलंदाजावर वाईट परिणाम होतो.” गोलंदाजाची कोणीही पर्वा करत नाही. त्यांचे अपील का मागे घ्यावे? लाखो लोकांसमोर त्यांचा अपमान का व्हावा? दिग्वेश राठी यांनी नियमांनुसार रनआउटसाठी अपील केले होते, असा प्रश्नही आर अश्विनने उपस्थित केला.
दिग्वेश राठी आयपीएल 2025 स्पर्धेत चर्चेत राहीला. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गोलंदाजी चांगली करतो पण विचित्र सेलिब्रेशनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. दिग्वेश राठीला तीन सामन्यात दंड ठोठावण्यात आला. त्याच्या सामना फी मधून वसुली करण्यात आली आहे. तसेच एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात आली होती. दिग्वेश राठीने 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 8.25 इतका आहे.