
आर अश्विन आणि विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेटचा एक काळ एकत्र गाजवला आहे. आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. आर अश्विन निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर आपली मतं दिलखुलासपणे मांडत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला टीकाकारांच्या रोषाला सामोरे जावं लागतं. इतकंच काय तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याविरुद्ध काही बोलला, तर चाहत्यांचा रडारवर देखील येतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि आर अश्विनला तात्काळ विराट कोहलीला फोन करावा लागला. या पोस्टमध्ये आर अश्विनने पुन्हा एकदा विराट कोहलीवर टीका केल्याचं बोललं जात आहे. विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा चांगला टी20 खेळाडू असल्याची पोस्ट आर अश्विनच्या नावावर खपवली जात आहे. यानंतर आर अश्विनने या पोस्टला उत्तर देत सांगितलं की विराट कोहलीशी चर्चा केली आणि त्यामुळे आमच्या दोघांमधील नातं आणखी घट्ट झालं आहे.
आर अश्विन आणि विराट कोहली यांनी 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. विराट कोहलीच्या नेतृत्वात आर अश्विन नंबर 1 फिरकीपटू राहिला आहे. त्यामुळे आर अश्विनवर आरोप होताच त्याने तात्काळ विराट कोहलीला फोन लावला. आर अश्विनने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं की, “मी विराटकडे अप्रत्यक्ष हल्ल्याबद्दल माझी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावरील हे खळबळजनक चाहते युद्ध पाहून आम्ही दोघेही चांगलेच हसलो. आम्हाला जोडण्याची आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”
Just spoke to Virat about “Rajiv1841’s” concern on the indirect attack and we both had a good laugh about how social media works on such click baity fan wars.
Thanks for giving us a reason to bond and talk.☺️☺️ https://t.co/0tXfxoNM6y
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 29, 2026
सोशल मीडियावर चाहत्यांचं द्वंद्व हे काय नवीन गोष्ट नाही. चाहते आपल्या लाडक्या खेळाडूची बाजू घेऊन कायम पोस्ट करत असतात. इतकंच काय तर आपल्या लाडक्या खेळाडूला कोण काही बोललं तर आवडत नाही. त्यावर अक्षरश: तुटून पडतात. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये असा वाद पाहायला मिळतो. कधी कधी रोहित आणि विराटचे चाहतेही भिडतात. असंच काहीसं प्रकरण विराट कोहली आणि आर अश्विनचं आहे.