AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीचा जबडा काही केल्या बंद होईना, सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सनी हात टेकले, मात्र सरकारी डॉक्टरांनी असे वाचवले….

अनेकांना विचित्र आजाराने त्रस्त केलेले असते. अशाच एका दुर्मिळ आजाराने पीडित १० वर्षांच्या मुलीला तिचा जबडाच काही केल्या बंद करता येत नव्हता. देश आणि विदेशाचे डॉक्टर उपचार करुन थकले होते, अखेर सरकारी डॉक्टरांनी त्यावर उपाय शोधला...

मुलीचा जबडा काही केल्या बंद होईना, सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सनी हात टेकले, मात्र सरकारी डॉक्टरांनी असे वाचवले....
ADEM
| Updated on: Jan 29, 2026 | 5:25 PM
Share

एका अल्पवयीन मुलीला विचित्र आजाराचा सामना करावा लागला होता. या मुलीचा जबडा खुला राहिल्याने तिच्या प्राणावर मोठे संकट उभे राहिले होते. अनेक देश विदेशातील डॉक्टरांकडे या आजारावर उत्तर नव्हते. या मुलीचा जबडा उघडा राहिल्याने तिच्या शरीरात इन्फेक्शनचा धोका निर्माण झाला होता. दातांची दिशा बदलली गेली होती. अनेक डॉक्टर उपाय करुन अक्षरश: थकले परंतू या विचित्र आजारावर उत्तर सापडत नव्हते. अखेर कोलकाताच्या सरकारी डॉक्टराने हा चमत्कार घडवला आणि या मुलीची त्रासातून सुटका करत तब्बल ९१२ दिवसानंतर तिला तोंड बंद करता आले आहे.

१० वर्षांच्या मुलीला एका असामान्य आजाराची लागण झाली होती. त्यामुळे तिच्या जबडा आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान पोहचले होते. ज्यामुळे सुमारे ९१२ दिवस तिला तिचे तोंड बंद करता येत नव्हते. राज्यातील डॉक्टर आणि बाहेरील अनेक रुग्णालयात उपचार करण्यात येऊनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर कोलकाता येथील अहमद डेंटल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार केल्यानंतर या चिमुरडीला तिचे तोंड बंद करता आले आहे.

हॉस्पिटलच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने एका न्यूज चॅनलला सांगितले की, या मुलीला एक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफेलोमायलायटिस ( ADEM ) हा दुर्धर आजार झाला होता. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. या ऑटोईम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून यात इम्युन सिस्टीम मेंदू आणि स्पायनल कॉर्डवर हल्ला करते.

दात खूप मागे हटले

प्रदीर्घ काळापर्यंत तोंड बंद न करता आल्याने या चिमुरडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.या आजारामुळे तिचे तोंड कोरडे पडले. जबड्याचे संतुलन बिघडले आणि दात असामान्य पद्धतीने वरच्या दिशेने वाढू लागले. ज्यास सुप्रा-इरप्शन म्हटले जाते असे येथील डॉक्टरने सांगितले. ते पुढे म्हणाले की बराच काळ म्हणजे सुमारे वर्षांहून अधिक काळ तोंड उघडेच राहिल्याने दात त्याच्या सामान्य स्थितीपेक्षा खूप मागे हटले होते. ज्यामुळे इन्फेक्शन आणि कायम स्वरुपाचा धोका वाढला होता.

हाच एक पर्याय उरला

उपचाराची योजना तयार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एक विशेष मेडिकल बोर्डची स्थापना करण्यात आली. विस्तृत तपासणीनंतर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की तोंड बंद करणे हे वैद्यकीय दृष्ट्या महत्वाचे होते. या मुलीवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले की या प्रकरणात जबडा बंद करण्यासाठी आणि पुढील अडचणींवर मात करण्यासाठी पाठचे दात काढणे हाच एक व्यवहारिक पर्याय उरला होता. अलिकडे या संदर्भात ऑपरेशन केल्यानंतर मुलीला खूपच आराम मिळाला आणि तिला तिचे तोंड बंद करता आले.

आता ही मुलगी तोंड बंद करु शकते

हा उपचार भविष्यात तिचे दात खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि तोंडाच्या इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी उपयोगी ठरला आहे. आता एक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफेलोमायलायटिस (ADEM) हा दुर्धर आजारावरही उपचार सुरु करण्यात आला आहे. आता ही मुलगी तोंड बंद करु शकत असल्याने तिच्या प्राणावरचं संकट टळले आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.