AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे, त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद
अजित पवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 5:37 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी होतं.  दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज अनेक शहरांमध्ये बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात कुठे कुठे बंद? 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. कालपासून सगळीकडे शोकाकुल वातावरण पहायला मिळत आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर  करण्यात आला आहे.

इगतपुरीमध्ये बंद 

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.  इगतपुरीतही व्यापारी संघटनेकडून आज शहरात बंदची हाक देण्यात आलेली आहे. इगतपुरीतील भाजी मंडई कायमच गजबजलेलं असतं मात्र आज मार्केट बंद असल्याने या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे.

माढ्यात बंद 

सोलापूरच्या माढ्यात देखील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अहिल्यानगरमधील नेप्ती उपबाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद ठेवत, अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जळगाव जिल्ह्यातही बंद 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, अजित पवार यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान आज जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याच्या पहायला मिळाल्या.  मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव शहरात आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.