AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : बकऱ्या चारणाऱ्या मुलीचे ३६० डिग्री सिक्स पाहाल, तर म्हणाल, तिला टीम इंडियात घ्या

पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटर्सही टॅलेंटमध्ये कुठेही कमी नाहीयत. त्याचच एक उदहारण राजस्थानच्या एका गावात दिसून आलय. राजस्थानात एका 14 वर्षाच्या मुलीची बॅटिंग पाहून तुम्ही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवची आठवण येईल.

VIDEO : बकऱ्या चारणाऱ्या मुलीचे ३६० डिग्री सिक्स पाहाल, तर म्हणाल, तिला टीम इंडियात घ्या
Rajasthan GirlImage Credit source: social media
| Updated on: Feb 14, 2023 | 1:42 PM
Share

बाडमेर : IPL च्या धर्तीवर लवकरच भारतात वुमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंट सुरु होणार आहे. कालच WPL साठी ऑक्शन पार पडलं. पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीने आता महिला क्रिकेटर्सही आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटर्सही टॅलेंटमध्ये कुठेही कमी नाहीयत. त्याचच एक उदहारण राजस्थानच्या एका गावात दिसून आलय. राजस्थानात एका 14 वर्षाच्या मुलीची बॅटिंग पाहून तुम्ही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवची आठवण येईल. सूर्यकुमार यादवला टीम इंडियात मिस्टर 360 डिग्री म्हणतात. सूर्यकुमार फाइन लेग, थर्ड मॅनला खूप सहजतेने सिक्स मारतो. या मुलीची बॅटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच सूर्यकुमार यादवची आठवण येईल. सोशल मीडियावर या मुलीच्या बॅटिंगचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील शिव शेरपुरा कानासर गावात ही मुलगी राहते. या 14 वर्षाच्या मुलीच नाव मूमल मेहर आहे.

मूमल काय करते?

अत्यंत सहजतेने फोर-सिक्स मारणारी मूमल मेहर अवघ्या 14 वर्षांची आहे. ती 8 व्या इयत्तेत शिक्षण घेतेय. वडिल मठार खान शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मूमला क्रिकेटची भरपूर आवड आहे. पण तिच्याकडे खेळण्यासाठी साधे बूट नाहीयत. घराच बांधकाम सुद्धा अर्धवट आहे.

मूमलला कोण कोचिंग देतय?

मुलीला क्रिकेटच चांगलं प्रशिक्षण देता येईल, इतकं या कुटुंबाचं उत्त्पन नाहीय. सध्या शाळेतील शिक्षक रोशन खान मूमलचे कोच आहेत. जे तिला क्रिकेटचे बारकावे शिकवतायत. रोशन खान दररोज तीन ते चार तास मूमलकडून क्रिकेटची प्रॅक्टिस करुन घेतात.

बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते

क्रिकेट खेळण्याबरोबरच मूमलला घरच्या कामकाजात आईला मदत करावी लागते. ती बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते. मात्र एवढ सगळं करुनही मूमलने तिची क्रिकेटची आवड जपलीय. मूमलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला टीम इंडियात घेण्याची मागणी होऊ शकते. तिला योग्य ट्रेनिंग मिळाल्यास मूमल लवकरच टीम इंडियात दिसू शकते.

मूमलने काय सांगितलं?

“मला भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादवची बॅटिंग फार आवडते. त्याला पाहूनच मी लांब-लांब सिक्स मारण्याचा प्रयत्न करते. रोज तीन ते चार तास प्रॅक्टिस करते. रोशन भाई मला कोचिंग देतात. अलीकडेच ग्रामीण ऑलिम्पिकमध्ये मी ग्राम पंचायत ते जिल्हा स्तरापर्यंत खेळली. फायनलच्या अटीतटीच्या सामन्यात आमच्या टीमचा पराभव झाला. माझी चुलत बहिण अनीसाला मला क्रिकेटबद्दल टिप्स देत असते. अनीसा आणि मी ग्रामीण ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळलोय” असं मूमलने सांगितलं. चुलत बहिणीकडून मिळाली प्रेरणा

“मी वयाच्या 9 व्या वर्षापासून अनीसासोबत क्रिकेट खेळतेय. अनीसाची अंडर 19 राजस्थान टीममध्ये निवड झाल्यानंतर माझ्या मनात क्रिकेटबद्दल रुची अधिक वाढली. सूर्यकुमारची बॅटिंग पाहिल्यानंतर गावातल्या मुलांसोबत खेळताना तशाच पद्धतीचे फटके मारण्याचा प्रयत्न करते” असं मूमल म्हणाली.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...