MI vs RR : ‘या’ 4 ओव्हरमध्येच कळलेलं आज मुंबई इंडियन्सच काही खरं नाही

MI vs RR : आयपीएलमधील यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला आहे. या टीमला आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवता येत नाहीय. स्टार खेळाडूंचा भरणा असूनही मुंबई इंडियन्सची टीम संघर्ष करतेय. मुंबई इंडियन्सच्या टीमला पॉइंट टेबलमध्ये जबर फटका बसला आहे.

MI vs RR : 'या' 4 ओव्हरमध्येच कळलेलं आज मुंबई इंडियन्सच काही खरं नाही
mi vs rr toss ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 8:58 AM

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच प्रदर्शन काही खास नाहीय. कॅप्टन बदलूनही मुंबई इंडियन्सला काही फायदा झालेला नाही. सगळ्या टीम्सची नव्याने रचना झाल्यानंतर सलग तिसऱ्या सीजनमध्येही मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरु आहे. यंदाच्या सीजनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावावा लागणार आहे. यापुढे प्रत्येक सामना मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’च असेल. मुंबई इंडियन्सच्या टीमला पॉइंट टेबलमध्ये जबर फटका बसला आहे. ही टीम सातव्या स्थानावर आहे. आता उर्वरित सहा सामन्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवावाच लागेल. त्याचबरोबर नेट रनरेटही कायम ठेवावा लागेल, तरच मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. मुंबई इंडियन्सची टीम खेळापेक्षा पण कॅप्टनशिप बदलामुळे जास्त चर्चेत राहिली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्यामध्ये जमत नाही, टीममध्ये एकोपा नाही अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवावा लागेल.

दरम्यान काल जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी राजस्थानला विजयासाठी 180 धावांच टार्गेट दिलं होतं. राजस्थानने 18.4 चेंडूत आरामात हे लक्ष्य पार केलं. जोस बटलरच्या (35) रुपाने राजस्थानने फक्त एक विकेट गमावला. फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या यशस्वी जैस्वालने मुंबई विरुद्ध तडाखेबंद शतक ठोकलं. 60 चेंडूत यशस्वीने नाबाद 104 धावा केल्या. यात 9 फोर, 7 सिक्स होते. मुंबईचा 8 सामन्यातील हा पाचवा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सने चालू सीजनमध्ये दुसऱ्यांदा मुंबईवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या टीमला फक्त दिल्ली कॅपिटल्स, RCB आणि पंजाब किंग्स याच टीम्सवर विजय मिळवता आलाय.

त्याचवेळी मुंबईच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

कालच्या सामन्यात मुंबईच्या पराभवाची स्क्रिप्ट पहिल्या चार ओव्हर्समध्येच लिहीली गेली होती. पहिल्या चार षटकात मुंबईने ओपनर रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे हुकूमी एक्के गमावले होते. रोहितला (6) रन्सवर बोल्टने सॅमसनकरवी झेलबाद केले. इशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. त्याला संदीप शर्माने सॅमसनकरवीच झेलबाद केलं. फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवचा विकेट सुद्धाच संदीप शर्माने काढला. मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने (10) रन्सवर त्याने पॉवेलकडे कॅच दिली. 3.1 ओव्हर्समध्ये 20 धावात मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. त्याचवेळी मुंबईच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कारण कुठल्याही टीमसाठी आघाडीच्या फळीने विजयाचा पाया रचण आवश्यक असतं. तिलक वर्माची 45 चेंडूतील (65) धावांची झुंजार खेळी आणि नेहल वढेराच्या 24 चेंडूतील (49) धावा यामुळे मुंबई इंडियन्सची टीम 180 धावांपर्यंत पोहोचू शकली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.