Ranji Trophy मध्ये अंडर 19 कॅप्टन यश धुलची तुफानी बॅटिंग, डेब्युमध्येच दोन्ही डावात सेंच्युरी

दिल्लीच्या यश धुलची (Yash Dhull) रणजी करंडक (Ranji Trophy 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी सुरु आहे. यश अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आहे.

Ranji Trophy मध्ये अंडर 19 कॅप्टन यश धुलची तुफानी बॅटिंग, डेब्युमध्येच दोन्ही डावात सेंच्युरी
यश धुल कठीण समयी फलंदाजीला आला व त्याने शेख रशीद सोबत तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे संघाने 291 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यशने 110 चेंडूत 110 धावा केल्या. यात 10 चौकार आणि एक षटकार होता. (ICC)
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 3:58 PM

नवी दिल्ली: दिल्लीच्या यश धुलची (Yash Dhull) रणजी करंडक (Ranji Trophy 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी सुरु आहे. यश अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. यशने पदार्पणाच्या रणजी सामन्यातच दोन्ही डावात शतकी खेळी केली आहे. तामिळनाडू (Tamilnadu) विरुद्ध यशने पहिल्या डावात 113 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शानदार शतक झळकवल आहे. डेब्यू सामन्यातच दोन्ही डावात शतक झळकवणारा यश रणजीमधला तिसरा फलंदाज बनला आहे. तामिळनाडू विरुद्धच्या रणजी लढतीत यशने पहिल्या डावात नाबाद 113 धावांची खेळी केली होती. त्याने 16 चौकार लगावले होते. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला 57 चेंडू लागले. यश रणजीमधलं पहिलं शतक पूर्ण करण्यासाठी 133 चेंडू खेळला.

याआधी कोणी केली अशी कामगिरी?

यश धुल मधल्याफळीत फलंदाजी करतो. दिल्लीचा कर्णधार प्रदीप सांगवानने यशवर विश्वास दाखवला व त्याला सलामीला पाठवलं. यश धुलने मिळालेल्या संधीच सोन करत थेट शतकी खेळी साकारली. यश धुलच्या आधी असे दोनच फलंदाज होते, ज्यांनी डेब्यु मॅचमध्येच दोन्ही डावात शतकी खेळी साकारली होती. गुजरातसाठी 1952-53 मध्ये नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी अशी कामगिरी केली होती. रणजीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारे ते पहिले क्रिकेटपटू आहेत. पहिल्या डावात 152 आणि दुसऱ्या डावात 102 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 2012-13 मध्ये महाराष्ट्राकडून विराग आवटेने अशी कामगिरी केली होती. त्यांनी डेब्युच्या दोन्ही डावात शतक झळकावले होते. पहिल्या डावात 126 आणि दुसऱ्या डावात 112 धावा केल्या होत्या.

दिल्ली आणि तामिळनाडूमधला हा कसोटी सामना ड्रॉ झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 452 धावा केल्या. युवा फलंदाज शाहरुख खानचं द्विशतक फक्त सहा धावांनी हुकलं.

ranji trophy 2022 yash dhull century in both innings against tamilnadu record

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.