AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : फक्त 3 धावांचं गणित चुकलं आणि गुजरातची संधी हुकली, केरळ पहिल्यांदाच फायनलमध्ये

रणजी स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना गुजरात आणि केरळ यांच्यात रंगला. हा सामना अनिर्णित ठरला. पण पहिल्या डावात गुजरातने केलेली चूक महागात पडली. अवघ्या 3 धावांनी उपांत्य फेरीची संधी हुकली. कसं काय ते समजून घ्या..

Ranji Trophy : फक्त 3 धावांचं गणित चुकलं आणि गुजरातची संधी हुकली, केरळ पहिल्यांदाच फायनलमध्ये
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 21, 2025 | 5:19 PM
Share

रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एका आश्चर्यकारक निकालाला सामोरं जावं लागलं. गुजरात आणि केरळ हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केरळच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात केरळने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 457 धावा केल्या. केरळच्या मोहम्मद अझहररुद्दीनची खेळी केरळच्या पथ्यावर पडली. त्याने नाबाद 117 धावांची खेळी केली. दुसरीकडे, केरळने पहिल्या डावात ठेवलेल्या 457 धावांचा पाठलाग करताना सर्व गडी बाद 455 धावा करता आल्या. खरं तर गुजरातकडे पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. पण केरळला पहिल्या डावात दोन धावांची आघाडी मिळाली आणि हेच पराभवाचं कारण ठरलं. दुसऱ्या डावात केरळने 4 गडी गमवून 114 धावा केल्या. पाच दिवसांचा खेळ संपल्याने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. पण पहिल्या डावात केरळकडे दोन धावांची आघाडी होती. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. याचाच अर्थ असा की गुजरातची अंतिम फेरीची संधी अवघ्या तीन धावांनी हुकली. तर गुजरातने पहिल्या डावात 458 धावा केल्या असत्या तर अंतिम फेरीचं तिकीट मिळालं असतं. पण नशिबाच्या चाव्या केरळच्या बाजूने होत्या असंच म्हणावं लागेल.

गुजरात संघ 9 विकेट गमवून 455 धावांवर होता. तेव्हा नागवासवालाने फटका मारला आणि सिली मिड ऑनला असलेल्या फिल्डरच्या हेल्मेटला लागून वर उडला. सचिन बेबीने ही संधी हेरली आणि झेल पकडला. पंचांकडे अपील केल्यानंतर नागवासवाला आऊट असल्याचं घोषित केलं. यामुळे केरळला पहिल्या डावात 2 धावांची आघाडी मिळाली. केरळ संघाची स्थापना 1950 मध्ये झाली होती. आतापर्यंत 74 वर्षांच्या इतिहासात केरळने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत केरळचा सामना विदर्भाशी होणार आहे. हा सामना 26 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

केरळ (प्लेइंग इलेव्हन): अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, सलमान निझार, वरुण नयनार, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीप), आदित्य सरवटे, अहमद इम्रान, एमडी निधीश, नेदुमनकुझी बेसिल.

गुजरात (प्लेइंग इलेव्हन): प्रियांक पांचाल, आर्या देसाई, सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, जयमीत पटेल, उर्विल पटेल (विकेटकीपर), चिंतन गजा (कर्णधार), विशाल जयस्वाल, रवी बिश्नोई, अरझान नागवासवाला, प्रियाजितसिंग जडेजा.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.