Ranji Trophy: 0,0,0,0…’या’ राज्याची टीम 46 रन्सवर All out, 21 ओव्हरही नाही खेळता आल्या

रणजी ट्रॉफीच्या सामन्यात गोलंदाजांनी कमालीच प्रदर्शन केलं.

Ranji Trophy: 0,0,0,0…या राज्याची टीम 46 रन्सवर All out, 21 ओव्हरही नाही खेळता आल्या
Ranji Trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 13, 2022 | 2:42 PM

नवी दिल्ली: रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याचदिवशी चाहत्यांना असं एक दुश्य पहायला मिळालं, ज्याची कोणी कल्पना केली नव्हती. रोहतकच्या लाहली मैदानावर हरिणाची टीम अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली. हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. हरियाणाची टीम अवघ्या 20.4 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली. हरियाणाचे चार बॅट्समन शुन्यावर आऊट झाले. फक्त एक बॅट्समन दोन आकडी धावा करु शकला. निशांत सिंधुने सर्वाधिक 19 धावा केल्या.

हिमाचलकडून वैभव अरोडा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 15 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. सिद्धार्थ शर्माने 3 विकेट्स काढल्या. कंवर अभिनयने 3 आणि ऋषी धवनने एक विकेट काढली.

हरियाणाचा आत्मघातकी निर्णय

हरियाणाचा कॅप्टन हिमांशु राणाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. लाहलीच्या मैदानात त्याचा हा निर्णय आत्मघातकी ठरला. हरिणायाला तिसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला झटका बसला. हरियाणाची निम्मी टीम 9 ओव्हर्सच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतली. निशांत सिंधुच्या 19 रन्समुळे टीमची धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली. निशांत सिंधु आऊट होताच जयंत यादव, अंशुल कंबोज आणि अजित चहल खातही उघडू शकले नाहीत. परिणामी हरियाणाची टीम 46 धावात ऑलआऊट झाली.

विकेट न गमावताच घेतली आघाडी

हरियाणाचे फलंदाज लाहलीच्या पीचवर टिकू शकले नाहीत. दुसऱ्याबाजूला हिमाचल प्रदेशच्या टीमला कोणतीही अडचण आली नाही. हिमाचलने कुठलाही विकेट न गमावता, हरियाणाची धावसंख्या पार केली.

मणिपूर-दिल्लीची हालत खराब

दुसऱ्या अन्य सामन्यात मणिपुरची टीम सिक्कीम विरुद्ध 186 रन्समध्ये ऑलआऊट झाली. दिल्लीच्या टीमने बातमी लिहित असताना, 163 धावात 9 विकेट गमावल्या होत्या. महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज मनोज इनागेलने एका डावाच पाच विकेट घेण्याचा कारनामा केला. दिल्लीसाठी ध्रुव शौरने 41 आणि कॅप्टन यश ढुलने 40 धावा केल्या. दुसरे फलंदाज अपयशी ठरले.