AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 14 व्या वर्षी झाला ब्लड कॅन्सर, युवराज सिंग सारखा लढला, आता ठोकल्या 548 धावा

कमलला वयाच्या 14 व्या वर्षी ब्ल्ड कॅन्सर झाला होता. त्याच्या ब्लड प्लेटलेट्स भरपूर कमी झाल्या होत्या. दिल्लीमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. त्यात त्याला स्टेज 2 चा ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं.

वयाच्या 14 व्या वर्षी झाला ब्लड कॅन्सर, युवराज सिंग सारखा लढला, आता ठोकल्या 548 धावा
Uttara khand cricketer kamal singh Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 16, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई: रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडचा मोठा पराभव केला. मुंबईने तब्बल 725 धावांनी उत्तराखंडवर विजय मिळवला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या पराभवानंतर उत्तराखंड क्रिकेट असोशिएशन (Uttarakhand Cricket Association) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. उत्तराखंड क्रिकेट असोशिएशनशी अनेक वादही जोडले गेले आहेत. उत्तराखंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना वेळेवर हक्काचे पैसे मिळत नाहीयत. मात्र या परिस्थितीतही संघात असे काही खेळाडू आहेत, जे आपल्या प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियात संधीची वाट पाहतायत. या सीजनमध्ये उत्तराखंडसाठी काही खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलं. 21 वर्षाचा कमल सिंह (Kamal Singh) या खेळाडूंपैकी एक आहे. कमल सिंहने उत्तराखंडसाठी रणजी ट्रॉफीमध्ये 10 सामन्यात 548 धावा फटकावल्या.

त्याच्याच बळावर संघ क्वार्टर फायनलमध्ये

सर्विस विरोधात मागच्यावर्षी त्याने 82 धावांची इनिंग खेळली होती. 2020-21 मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत संघासाठी त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच्याच बळावर संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला होता. कमल सिंह साठी क्रिकेट सर्वकाही आहे. याच खेळाने त्याला जिवंत ठेवलय. कमलला लहान वयात कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढाव लागलं.

ब्लड कॅन्सरशी लढाई

कमलला वयाच्या 14 व्या वर्षी ब्ल्ड कॅन्सर झाला होता. त्याच्या ब्लड प्लेटलेट्स भरपूर कमी झाल्या होत्या. दिल्लीमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. त्यात त्याला स्टेज 2 चा ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं. पुढचं एक वर्ष कमलला खेळ आणि अभ्यासापासून लांब रहाव लागलं. अनेक महिने त्याला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं. त्यावेळी क्रिकेटमुळेच मला लढण्याच बळ मिळाल, अस कमल सांगतो. बिछान्यावर असताना मी मैदानात कधी परतणार, हाच विचार माझ्या डोक्यात चालू असायचा, असं कमल म्हणाला. क्रिकेट खेळण्याची माझी दृढइच्छाशक्ती होती. त्यामुळेच मी कॅन्सरवर मात करु शकलो, असं कमलने क्रिकबजशी बोलताना सांगितलं.

त्याला समजलं तेव्हा….

कमल त्यावेळी टीवी वर येणारा क्रिकेटचा प्रत्येक सामना पहायचा. कुटुंबातील सदस्यांनी बराच काळ कमलपासून त्याचा आजार लपवून ठेवला होता. त्यांनी कमलला जराशीही त्याच्या आजाराची कल्पना येऊ दिली नाही. कमलला या बद्दल समजल, तेव्हा त्याला जास्त फरक पडला नाही, कारण तो पर्यंत त्याला उपचारांची आणि केमोथेरपची सवय झाली होती. कमललला गौतम गंभीर सारखी फलंदाज बनायचं आहे.

मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आता हळूहळू हे स्वप्न सत्यात येऊ शकतं, असं वाटायला लागलय, असं कमल म्हणतो.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.