Ravindra jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO, म्हणाला, ‘अजूनही वेळ…..’

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 2:32 PM

बाळासाहेब ठाकरेंनी त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलय?

Ravindra jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO, म्हणाला, 'अजूनही वेळ.....'
Ravindra jadeja
Image Credit source: instagram

अहमदाबाद: गुजरातमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र जाडेजाही प्रचाराच्या मैदानात उतरला आहे, त्याची पत्नी रिवाबा जामनगर उत्तरमधून निवडणूक रिंगणात आहे. आज विधानसभेच्या 89 जागांसाठी मतदान सुरु आहे. रवींद्र जाडेजाने गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला. जाडेजाने मतदान केल्यानंतरचा फोटो फॅन्ससोबत शेयर केला.
या फोटोआधी जाडेजाने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. फॅन्समध्ये या व्हिडिओची चर्चा सुरु आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी रवींद्र जाडेजाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केलाय.

बाळासाहेब ठाकरेंनी त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलय?

रवींद्र जाडेजाने शेअर केलेल्या व्हिडिओला ‘अजूनही वेळ गेलेली नाही….’ असं कॅप्शन दिलय. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या मुखात नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे. ‘नरेंद्र मोदी गेले, तर गुजरात गेलं’ असं बाळासाहेब ठाकरेंनी त्या व्हिडिओममध्ये म्हटलं आहे. रवींद्र जाडेजा आपल्या पत्नीला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. हा खेळाडू गल्लीबोळात पत्नीच्या प्रचारासाठी फिरतोय. भाजपाच्या पोस्टर्सवरही जाडेजाजा फोटो आहे. ज्यावरुन वाद झालाय.

जाडेजाची बहिण आणि पत्नी आमने-सामने

रवींद्र जाडेजा पत्नी रिवाबासाठी प्रचार करतोय. दुसऱ्याबाजूला बहिण आणि वडिल काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतायत. जाडेजाची बहिण नैनाने 3 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ती आपल्या वहिनीविरोधात प्रचार करतेय. दुसऱ्याबाजूला जाडेजाच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याते ते भाजपा उमदेवार रिवाबाला मत न देण्याचं आवाहन करताना दिसताय.

अजूनही टीम इंडियाच्या बाहेर

सध्या रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. जाडेजाला आशिया कप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. तो न्यूझीलंड आणि आता बांग्लादेश विरुद्धच्या वनेड सीरीजपर्यंत फिट झालेला नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI