RCB vs CSK : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, आरसीबीची होम ग्राउंडमध्ये बॅटिंग, विराट किती धावा करणार?

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Toss : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 19 व्या मोसमात आपला सलग दुसरा सामना घरच्या मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आरसीबीने या सामन्यात चेन्नई विरुद्ध पहिले बॅटिंग करणार आहे.

RCB vs CSK : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, आरसीबीची होम ग्राउंडमध्ये बॅटिंग, विराट किती धावा करणार?
RCB vs CSK IPL 2026 Toss
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 05, 2026 | 8:00 PM

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात रविवारी 5 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने विजय मिळवला. लखनौने यासह 19 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हा सामना आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असता तर फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता असं आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला.

दोन्ही संघ अनचेंज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एका आठवड्याने आपला दुसरा सामना खेळत आहे. आरसीबीने 28 मार्चला हैदराबादला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. आरसीबीने चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर यलो आर्मीनेही त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा हा तिसरा सामना आहे. चेन्नईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे चेन्नई या सामन्यात विजय मिळवून पराभवाची हॅट्रिक टाळण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चेन्नई आरसीबीला रोखणार?

आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने बंगळुरु विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या काही सामन्यांत आरसीबी चेन्नईवर वरचढ असल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. चेन्नईने 21 सामन्यांमध्ये बंगळुरुवर मात केली आहे. तर आरसीबीने चेन्नईवर 13 वेळा विजय साकारला आहे. तर उभयसंघातील 1 मॅचचा निकाल लागला नाही. तसेच आरसीबीने चेन्नई विरुद्ध गेल्या 4 पैकी सलग 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.  त्यामुळे चेन्नई आपल्या विरुद्ध आरसीबीला सलग चौथा सामना जिंकण्यापासून रोखणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लाईव्ह स्कोअरकार्ड


चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री आणि खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि जेकब डफी.

Follow Us