RCB vs LSG : लखनौकडे आरसीबीचा हिशोब करण्याची संधी, गतविजेत्या बंगळुरुला लोळवणार?
Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants : रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने लखनौ विरुद्ध गेल्या मोसमात 220 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत एकतर्फी फरकाने सामना जिंकला होता.

Jitesh Sharma and Rishabh Pant RCB vs LSG IPLImage Credit source: Bcci
आयपीएल 2026 स्पर्धेत ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्ससमोर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. हा सामना बंगळुरुचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. लखनौकडे या सामन्यात विजय मिळवून गेल्या मोसमातील पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. लखनौला गेल्या हंगामात (IPL 2025) आरसीबीकडून 220 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे लखनौ या पराभवाचा हिशोब करणार की गतविजेता आपली घोडदौड कायम राखत चौथा विजय साकारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Follow Us
