AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mi vs CSk : हा क्षण ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मुख्य कारणं!

चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली. मुंबईची ताकत ही फलंदाजी आहे मात्र बॅटर्सनेच सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच काही अशीसुद्धा कारणं आहेत ज्यामुळे मुंबईने सामना गमावला.

Mi vs CSk : हा क्षण ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मुख्य कारणं!
| Updated on: Apr 09, 2023 | 4:01 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तुल्यबळ संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबईवर चेन्नई संघाने 7 विकेट्स ने विजय मिळवला, यंदाच्या पर्वातील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर पलटण घरच्या मैदानावर विजय मिळवेल अशी अशा सर्व चाहत्यांना होती मात्र चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली. मुंबईची ताकत ही फलंदाजी आहे मात्र बॅटर्सनेच सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच काही अशीसुद्धा कारणं आहेत ज्यामुळे मुंबईने सामना गमावला.

मुंबई  संघाने एकदम झकास सुरूवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चौकार षटकार मार आक्रमक सुरूवात करून दिली होती. रोहितला तुषार देशपांडेने बोल्ड आऊट केलं त्यानंतरही ईशानने आपली फटकेबाजी कायम ठेवली होती. मात्र त्यानंतर संघाच्या 64 धावांवर ईशानला जडेजाने आपल्या जाळ्यात अडकवलं.

ईशान मोठा  फटका खेळण्याच्या नादात कॅच आऊट झाला. सामन्यातील ही विकेट टर्निंग पॉईंट ठरली. कारण ईशान बाद झाल्यावर मुंबईच्या खेळाडूंना भागीदारी करता आली नाही. ईशाननंतर सूर्यकुमार यादव 1 धाव काढून आऊट झाला, आता आशा होती ती म्हणजे युवा खेळाडू तिलक वर्मा याच्याकडून कारण मागील सामन्यातही त्यानेच शेवटपर्यंत फलंदाजी करत एकट्याने संघाला सन्मानजनक मजल मारून दिली  होती.

तिलक वर्माही बाद झाला, मुंबईचे मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड यांनीही मोठी खेळी करता आली नाही. यामधील एका खेळाडूने जरी शेवटपर्यंत टिकून राहत फलंदाजी केली असती तर धावसंख्या 180 पेक्षा जास्त झाली असती.

मुंबईच्या बॉलिंग विभागातही हुकमी एक्क्क्यासारखे गोलंदाज नाहीत. याआधी कमी स्कोर असतानाही कित्येकवेळा सामने जिंकून दिले आहेत. मात्र आज डेव्हॉन कॉनवेची सुरूवातीची विकेट गमावल्यावर  विकेट मिळवता आली नाही. अजिंक्य रहाणेने सामना पूर्णपणे मुंबईच्या पारड्यात झुकवला होता.

दरम्यान, विकेटच न गेल्याने गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसून आला.  कोणत्याही गोलंदाजाने भेदक असा मारा केला नाही. त्यामुळे सीएसकेने सहजपणे मुंबई संघावर मात केली.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.