
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन टी20 मालिकेत एकूण दहा सामने खेळणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी लिटमस टेस्ट आहेत. त्यामुळे या मालिकेत खेळणारे खेळाडूच टी20 वर्ल्डकपमध्ये खेळतील यात काही शंका नाही. यात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या संघात शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचं कमबॅक झालं आहे. दोघांनी दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन केलं आहे. शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. त्यामुळे तो संघाचा भाग असेल यात काही शंका नाही. पण त्याच्या नावापुढे स्टार लावला आहे. त्यामुळे खेळणार की नाही हे फिटनेसवर अवलंबून असेल.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियासाठी निवडलेल्या टी20 संघच कायम ठेवला आहे. हार्दिक पांड्याबाबत एकमेव बदल करण्यात आला आहे दुसरीकडे, या संघातून रिंकु सिंहला डच्चू दिला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघातही नसेल अशी आता चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियातील टी20 मालिकेत रिंकूला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण हा सामना देखील पावसामुळे सामना रद्द झाला होता. रिंकु सिंह व्यतिरिक्त नितीश कुमार रेड्डी यालाही या संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणार नाही अशी चर्चा रंगली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही हाच संघ खेळेल यात काही शंका नाही. पण एखाद दुसरा खेळाडू जखमी झाला तर या दोघांचा विचार केला जाईल. त्यामुळे या दोन महिन्यात काय घडतं यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे सध्यातरी हाच संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धत खेळेल असंच बोललं जात आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर