IND vs SA : श्रेयस अय्यर वनडे मालिकेला मुकणार! चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हे दोन खेळाडू शर्यतीत

India vs South Africa: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून होत आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने खेळणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्या जागी फलंदाजीसाठी दोन खेळाडू शर्यतीत आहेत.

IND vs SA : श्रेयस अय्यर वनडे मालिकेला मुकणार! चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हे दोन खेळाडू शर्यतीत
IND vs SA : श्रेयस अय्यर वनडे मालिकेला मुकणार! चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी हे दोन खेळाडू शर्यतीत
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 11, 2025 | 4:12 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने निवड समितीची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघ निवडताना पुन्हा एकदा डोकेफोडी करावी लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात असतील यात काही शंका नाही. पण दुखापतीमुळे श्रेयसचं या मालिकेत खेळणं खूपच कठीण आहे. 30 नोव्हेंपासून भारत दक्षिण तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड अद्याप केलेली नाही. पण या संघात श्रेयस अय्यरची दुखापतग्रस्त असल्याने निवड होणं कठीण आहे. कारण तो दुखापतीतून अजून सावरलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर जर या वनडे मालिकेला मुकला तर त्याच्या जागी म्हणजेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण येईल? असा प्रश्न आहे. या शर्यतीत दोन फलंदाजांची नावं आहेत.

श्रेयस अय्यरने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसहीत अनेक मालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत संघाला सावरलं देखील आहे. त्यामुळे त्याची उणीव अनेकदा भासली आहे. पण दुखापतग्रस्त असल्याने त्याची जागा कोण घेणार? असा प्रश्न आहे. कारण त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी एक महिना लागेल असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे वनडे मालिकेला श्रेयस मुकला तर ऋषभ पंत किंवा तिलक वर्माचा संघात एन्ट्री होऊ शकते. या दोन्ही खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकासाठी तिलक वर्मा बेस्ट पर्याय मानला जात आहे. त्याने या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे. आशिया कप 2025 स्पर्धेत या क्रमांकावर खेळत त्याने विजयश्री खेचून आणला होता.

श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून कमबॅक करण्याची शक्यता आहे. ही वनडे मालिका जानेवारीत होणार आहे. तिथपर्यंत दुखापतीतून सावरण्यासाठी त्याच्याकडे बराच वेळ आहे. बीसीसीआय देखील श्रेयस अय्यरच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे. घाई गडबडीत कोणता निर्णय घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. श्रेयस अय्यरला फिट अँड फाईन होण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा अवधी लागू शकतो. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेच्या वनडे मालिकेसाठी हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांचं कमबॅक होऊ शकतं.