आरसीबीविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच ऋषभ पंतने नांगी टाकली, थेट पुढच्या हंगामाचं सांगून टाकलं
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची स्थिती खूपच वाईट आहे. खरं तर लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त काही सामन्यांची औपचारिकता आहे. असं असताना कर्णधार ऋषभ पंतनेही नांगी टाकून दिली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 50वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात दोन पावसामुळे खंड पडला. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल की नाही याबाबतही साशंकता आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतरच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नाणेफेक गमावताच ऋषभ पंतने या स्पर्धेतील संघाचं आव्हान संपुष्टात आल्याचं मान्य केलं. ऋषभ पंतने सांगितलं की, या पर्वात ज्या चुका झाल्या त्या दुरूस्त करून पुढच्या पर्वात चांगली कामगिरी करू. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी सात सामने गमावले आहे. त्यामुळे गुणतालिकेत 4 गुणांसह तळाशी आहे.
काय म्हणाला ऋषभ पंत?
आयपीएल सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर समालोचकांनी कर्णधार ऋषभ पंतशी चर्चा केली. यावेळी समालोचकाने संघात सध्या काय चर्चा होत आहे? असा प्रश्न विचारलं. तेव्हा ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्हाला माहिती आहे की आम्ही टॉपचे खेळाडू आहोत, पण कधी कधी काही गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. क्रिकेट असंच असतं. बहुतांश याच गोष्टी होतात की आम्हाला गोष्टी स्पष्ट दिसत नाही. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदल झाले आहेत आणि आम्ही येथे धडा घेऊन पुढच्या पर्वात चांगली कामगिरी करू. टी20 क्रिकेटमध्ये एक स्थिर वातावरण असणं आवश्यक आहे. त्यासोब बदलही आवश्यक असतो.’
🚨 Toss 🚨@RCBTweets have won the toss and elected to bowl first against @LucknowIPL in Lucknow.
Updates ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB pic.twitter.com/Z5DSxyelwt
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026
लखनौ सुपर जायंट्सची या पर्वातील सुरूवात पराभवाने झाली. दिल्ली कॅपिटल्सने सहा विकेटने पराभूत केलं होतं. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने सलग दोन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे संघाचं कमबॅक झालं असं वाटलं होतं. पण त्यानंतर पराभवाची मालिका सुरू झाली. सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गुजरात टायटन्स, आरसीबी, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकता नाईट रायडर्स आणि तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सनेही पराभूत केलं. त्यात ऋषभ पंतची कामगिरीही सुमार राहिली. या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू असूनही 9 सामन्यात फक्त 204 धावा केल्या आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 130 पेक्षा कमी आहे.