ऋषभ पंतने ती चूक पुन्हा केली आणि विकेट गेली! सराव सामन्यात 2 धावा करून बाद Watch Video

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळत आहे. या सामन्यातून भारतीय खेळाडूंना अभ्यास किती झाला? याचा अंदाज येईल. या सामन्यात ऋषभ पंतने पु्न्हा एकदा चूक केली आणि 2 धावा करून बाद झाला.

ऋषभ पंतने ती चूक पुन्हा केली आणि विकेट गेली! सराव सामन्यात 2 धावा करून बाद Watch Video
ऋषभ पंतने ती चूक पुन्हा केली आणि विकेट गेली! सराव सामन्यात 2 धावा करून बाद Watch Video
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2026 | 10:28 PM

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका क्रिकेट इलेव्हनसोबत सराव सामना खेळत आहे. तीन दिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंच्या फॉर्मची चाचपणी घेता येणार आहे. पहिल्या दिवसावर श्रीलंकेने मजबूत पकड मिळवली होती. 363 धावा करत डाव घोषित केला होता. या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताने जोरदार कमबॅक केलं. भारताने दुसऱ्या दिवशी 357 धावा केल्या. अजूनही 6 धावांनी पिछाडीवर आहे. असं असताना काही बाबतीत टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या सामन्यात फेल गेला. खरं तर या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र दोन धावा करून तंबूत परतला.

श्रीलंकेने केलेल्या 363 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल भोपळा फोडू शकला नाही. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. केएल राहुल बाद झाल्यानंतर पडिक्कलला रवींद्र जडेजाची साथ लाभली. या दोघांची भागीदारी जमली आणि देवदत्त पडिक्कलने शतक ठोकलं. शतकी खेळीनंतर देवदत्त पडिक्कल रिटायर्ड हर्ट झाला आणि ऋषभ पंत फलंदाजीला आला. भारताने तेव्हा 168 धावा केल्या होत्या. त्यानंतर पंतने चार चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा केल्या. त्यानंतर रमेश मेंडिसने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका मारला. पण लाँग ऑफला बाउंड्रीजवळ झेल बाद झाला.

ऋषभ पंतने अशा पद्धतीने विकेट फेकल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण यापूर्वी त्याने अशाच पद्धतीने विकेट फेकली आहे. त्याच चुकांचा पाढा परत वाचल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढणं सहाजिकच आहे. खरं तर, मैदानात उतरल्यापासूनच तो खूप आक्रमक मूडमध्ये दिसत होता. पण कसोटीत असा पवित्रा काही कामाचा नसतो. बाद होण्याच्या दोन चेंडूंपूर्वी त्याने मारलेला एक शॉट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून थोडक्यात गेला होता. तरीही त्याने बोध घेतला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us