Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा

आयपीएल 2026 स्पर्धा संपण्यापू्र्वीच कर्णधार ऋषभ पंतची गच्छंती झाली आहे. सलग दोन पर्वात कर्णधारपद भूषवल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. ऋषभ पंत फलंदाजी आणि कर्णधार भूषवण्यात पूर्णपणे फेल गेला आहे. आकडेवारी पाहिल्यानंतर ही बाब लक्षात येईल.

| Updated on: May 29, 2026 | 7:36 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI)

2 / 5
ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

3 / 5
ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

4 / 5
ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

5 / 5
आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us