AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु आता पुन्हा एकदा लवकरच पावसानं पुनरागमन होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा
IMD Monsoon UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 15, 2026 | 5:10 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाभावी पिकं सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट सतावत आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून तब्बल 15 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, पुढील दहा तासांमध्ये या राज्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या काळात 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहनही भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

कोणत्या राज्यांना हाय अलर्ट?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारत आणि पूर्व भारतात पुढील दहा तासांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, परंतु आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वीस जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, पुढील काही तासांमध्ये मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. परंतु वीस तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक