AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिची साडेसाती सुरू असताना या चुका करू नका! अन्यथा अडचणीत होईल वाढ, काय सांगते शास्त्र?

प्रत्येकाच्या आयुष्यात दोनदा शनिची साडेसाती येते. या साडेसातीत कर्मानुसार फळं मिळातात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे हा काळ खूपच कठीण मानला जातो. असं असताना साडेसाती सुरू असताना काही चुका करणं टाळणं आवश्यक आहे.

शनिची साडेसाती सुरू असताना या चुका करू नका! अन्यथा अडचणीत होईल वाढ, काय सांगते शास्त्र?
शनिची साडेसाती सुरू असताना या चुका करू नका! अन्यथा अडचणीत होईल वाढ, काय सांगते शास्त्र?Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 29, 2026 | 7:59 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि महाराजांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. आपल्या कर्मानुसार शनि महाराज फळं देत असतात. त्यामुळे एकदा का शनि महाराज आपल्या राशीत आले की पळता भुई थोडी होते. या कालावधीत आपल्याला आपल्या कर्मानुसार फळं मिळतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. शनिची साडेसाती 30 वर्षांनी फिरून आपल्या राशीत येत असते. त्यामुळे साधरणत: आयुष्यात दोन वेळा साडेसातीच्या प्रभावाला सामोरं जावं लागतं. शनि महाराजांचा गोचर कालावधी अडीच वर्षांचा असल्याने त्याचा प्रभाव राशीवर साडे सात वर्षे राहतो. एका राशीत विराजमान झाले तर त्याच्या पाठच्या आणि पुढच्या राशीवर प्रभाव दिसतो. त्यामुळे एकाच वेळी तीन राशींना साडेसाती आणि दोन राशींना अडीचकी सुरू असते. त्यामुळे या कालावधीत काही गोष्टी करण्यापासून दूर राहिलं पाहीजे.

कमकुवत व्यक्तीला त्रास देऊ नका: शनि महाराजांचा कमकुवत व्यक्तींना त्रास दिलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे राजाचा रंक करण्यासही मागे पुढे पाहात नाही. गरीब, मजूर आणि कमकुवत व्यक्तींसोबत चुकीचं वागू नये. गरीबाची थट्ट किंवा अपमान केल्यास शनिचा प्रकोप अजून वाढतो.

गर्व करू नये: गर्वाचे घर नेहमी रिकामी असते, या उक्तीप्रमाणे साडेसातीच्या काळात फटका बसतो. कोणत्याही गोष्टीचा अहंकार व्यक्तीचं नुकसान करून टाकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, अहंकारी व्यक्तीला शनि महाराज धडा शिकवतात.

चुकीची कामं करू नका: शनि साडेसातीच्या काळात चुकीचं काम करण्यापासून दूर राहावं. चोरी, जुगार, दारू आणि अनैतिक संबंध या सारख्या गोष्टीपासून दूर राहावं. शनिच्या साडेसाती काळात याचा फटका बसतो.

आळस : आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे शनि साडेसाती काळात हाच आळस अंगलट येतो. कामं टाळण्याने अडचणी वाढतात. त्याचा त्रास वाढत जातो.

नियमांचं पालन करावं: अडचणींचा डोंगर उभा राहिला की चुकीच्या कामाकडे कल वाढतो. पण त्याचा फटका अधिक बसतो. त्यामुळे कायद्याचं चौकटीत बसूनच कामं करावी.

रागावर नियंत्रण ठेवा: सत्ता मिळाली की कोणलाही कसंही वागवण्याचा अहंकार येतो. तसेच छोट्या गोष्टींवरून इतरांवर राग व्यक्त करणे. त्यांना त्रास देणे. यामुळे शनिदेव नाराज होतात आणि तसाच धडा शिकवतात.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा