AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंड्याच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे वाढल्या किंमती..

इथेनॉलला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. त्यातच मक्क्याची मागणी वाढली आहे. यासोबतच आता अंड्यांच्या दरावरही याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. पेट्रोलमध्ये आता 20 टक्के इथेनॉल मिसळवण्यात येतंय.

अंड्याच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे वाढल्या किंमती..
egg price
| Updated on: Aug 29, 2026 | 7:38 PM
Share

इंधनात इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणावरुन साखर महाग झाल्याचा आरोप होत असतानाच आता इथेनॉलमुळे अंडी सुद्धा महाग झाले आहेत… ज्यामुळे एका वर्षात अंड्याची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढलीय. पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबड्यांना खाद्य म्हणून मुख्यत्वे मक्याचा सर्वाधिक वापर होतो. तोच मका इथेनॉल निर्मितीसाठीही मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. परिणामी कोंबड्याचं खाद्य महागल्यानं अंड्याचे दरही वाढलेयत. 6-7 रुपयांना मिळणारी अंडी आता 9 ते 10 रुपयांपर्यंत गेले आहेत. नॅशनल एग कॉर्डिनेशननुसार एकूण उत्पादनाच्या 37 टक्के मका इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापरला जातोय. भारतात 43. 4 मिलियन टन मक्याचं उत्पादन होतं. यापैकी 17 मिलियन टन मका इथेनॉल निर्मितीसाठी जातोय. 3 वर्षापूर्वी मक्याची किंमत प्रतिटन 14 हजार रुपये होती.

तीच किंमत आता प्रतिटन 26 हजार 500 वर गेलीय. गेल्या 5 महिन्यात मक्याची किंमत 20 टक्क्यांनी वाढली कोंबड्यांचं हेच मुख्य खाद्य महागल्यानं अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या एका अंड्यासाठी ग्राहकांना साधारणपणे 8 ते 9 रुपये मोजावे लागतायत.

भारत पेट्रोल-डिझेलसाठी प्रमुखपणे अरब देशांवर अवलंबून आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी भारत सरकारनं इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पेट्रोलमध्ये आता 20 टक्के इथेनॉल मिसळवण्यात येतंय. ऊस आणि मक्यापासूनच मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवलं जातं. मात्र सद्यस्थितीत त्याच इथेनॉलमुळे साखर आणि पाठोपाठ अंडीही महागल्याचं बोललं जातंय. इथेनॉलला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. वाहनचालक याला विरोध करत आहेत.

काहींचे म्हणणे आहे की, इथेनॉलच्या वापरामुळे गाड्या खराब होत आहेत. मात्र, सरकार इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहे. अरविंद केजरीवालही इथेनॉलला विरोध करताना दिसत आहेत. त्यांनी जोरदार विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चाही काढण्यात आला. अरब देशांकडून इथेनॉल खरेदी केल्यावर मोठ्या प्रमाणात पैसा जातो. तो पैसा वाचवण्यासाठी इथेनॉल हा पर्याय आणला आहे. मात्र, वाहनांच्या इंजिनवर याचा वाईट परिणाम होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा