AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?

भारत श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला असून 6 विकेट तंबूत धाडले आहेत. असं असताना ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात..

तू मला ताप भरवूनच इथून जा...! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
तू मला ताप भरवूनच इथून जा...! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: Aug 26, 2026 | 5:16 PM
Share

भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. या सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पण या सामन्यात ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही. कारण त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे आणि वेदना तीव्र होत असल्याने विकेटकिपींग करू शकत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे. असं असताना तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. तेव्हा दुखापतग्रस्त ऋषभ पंत पावसाचा आनंद लुटताना दिसला. सर्व खेळाडू मैदानाबाहेर आडोशाला गेले असताना ऋषभ पंत मात्र पावसाच्या सरींचा आनंद लुटत भिजत होता. यावेळी ऋषभ पंत आणि स्टँडमध्ये बसलेल्या एक चाहत्याचा संभाषणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मैदानात नेमकं काय घडलं?

ऋषभ पंतला पावसात भिजताना पाहून एका चाहत्याने व्हिडीओ शूट करत म्हंटलं की, ‘ऋषभ भाई.. खूप भीजू नको, ताप येईल. कारण इथलं पाणी आणि हवामान थोडं वेगळं आहे.’ चाहत्यांच्या या प्रेमळ सल्ल्यावर ऋषभ पंतनेही आपल्या शैलीत उत्तर दिलं. ऋषभ पंत म्हणाला की, ‘तू मला ताप भरवूनच इथून जा… जर नाही आला, तरीही कसा येईल ते बघ!’ ऋषभ पंतचा हा हजरजबाबीपणा पाहून व्हिडीओ शूट करणारा चाहताही हसू लागला आणि म्हणाला, ‘नाही, नाही भाई… असं नका म्हणू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो!’

ऋषभ पंत दुखापतग्रस्त

ऋषभ पंतला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच फलंदाजी करताना दुखापत झाली. त्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतावं लागलं होतं. पण त्यानंतर वेदनाशामक औषधं घेऊन पुन्हा मैदानात उतरला होती. यावेळी त्याने 89 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 63 धावांची खेळी केली. मात्र दुखापतीमुळे वेदना तीव्र जाणवू लागल्याने क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. इतकंच काय तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना ऋषभ पंत उजव्या खांद्यावर निळ्या रंगाचा एडव्हान्स्ड आइस काँप्रेशन रॅप बांधून फिरत होता. आता त्याची दुखापत किती तीव्र आणि दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरेल का? हा प्रश्न आहे.

Follow Us
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक