5 सामने, 1 मालिका, रियान पराग कॅप्टन, 21 जूनपासून सीरिजला सुरुवात, पाहा वेळापत्रक
Odi Series : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेत रियान पराग नेृतत्व करणार आहे. रियानच्या नेतृत्वात आसाम टीम नामिबिया दौऱ्यावर जाणार आहे. पाहा वेळापत्रक.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा याने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिल याला टेस्ट कॅप्टन्सी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या या इंग्लंड दौऱ्यादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आसाम टीम नामिबिया दौऱ्यावर जाणार आहे. नामिबिया आसाम टीम विरुद्ध एकूण 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. नामिबिया क्रिकेटने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
रियान परागकडे एकदिवसीय मालिकेचं कर्णधारपद
आसाम विरुद्ध नामिबिया या एकदिवसीय मालिकेचं आयोजन हे नामिबिया क्रिकेट ग्राउंड येथे करण्यात आलं आहे. ही 5 सामन्यांची मालिका 21 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. रियान पराग या मालिकेत आसाम टीमचं नेतृत्व करणार आहे. रियान पराग याला नेतृत्वाचा पुरेसा अनुभव आहे. रियानने आयपीएलच्या 18 व्या मोसमात संजू सॅमसन याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. तसेच रियानकडे नामिबिया दौऱ्यानिमित्ताने विदेशात नेतृत्व करण्याची चांगली संधी आहे. तर गेरहार्ड इरास्मस हा या मालिकेत नामिबियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच नामिबिया टीममध्ये जेजे स्मिट आणि जॉन निकोल लॉफ्टी इटन या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. तसेच नामिबिया टीम याआधी पंजाब आणि कर्नाटक विरुद्ध खेळली आहे.
रियान परागची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रियान पराग याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. मात्र त्याला आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली, हे महत्त्वाचं आहे. रियानने टीम इंडियाचं 9 टी 20i आणि 1 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. रियानने टी 20i क्रिकेटमध्ये 106 तर वनडेत 15 धावा केल्या आहेत. तसेच रियानने टी 20i मध्ये 4 तर वनडेत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
FNB Eagles vs Assam Cricket Association🏏
Men’s cricket action is back, and we can’t wait to host you at the FNB Namibia Cricket Ground! #CricketNamibia #EaglesPride #FNBNamibia pic.twitter.com/zKjihvF7jL
— Official Cricket Namibia (@CricketNamibia1) June 10, 2025
रियान परागची आयपीएल कारकीर्द
तसेच रियानने 83 आयपीएल सामन्यांमधील 72 डावांमध्ये 7 अर्धशतकांसह 141.85 च्या स्ट्राईक रेटने आणि 26.1 च्या सरासरीने 1 हजार 566 धावा केल्या आहेत. रियानने या दरम्यान 111 चौकार आणि 87 षटकार लगावले आहेत. तसेच रियानने आयपीएलमध्ये 7 विकेट्स मिळवल्या आहेत.
