AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Birthday : रोहित शर्मा याच्या लव्हस्टोरीमध्ये युवराज बनलेला ‘व्हिलन’, सिनेमापेक्षाही थ्रिलवाली लव्हस्टोरी!

रोहित तर सर्वांचा आवडता आहेच पण सोबत त्याची आणि रितीकाची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच आवडते.  रोहित आणि रितिकाची प्रेमकहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षाही कमी नाहीये.

Rohit Sharma Birthday : रोहित शर्मा याच्या लव्हस्टोरीमध्ये युवराज बनलेला 'व्हिलन', सिनेमापेक्षाही थ्रिलवाली लव्हस्टोरी!
| Updated on: Apr 30, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूडप्रमाणेच क्रिकेट विश्वातही अनेक कपल्स लोकप्रिय आहेत. यामध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा, महेंद्र सिंग धोनी- साक्षी, के.एल. राहुल-आथिया शेट्टी, रोहित शर्मा-रितिका यांसारख्या अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या जोड्यांप्रमाणेच त्यांच्या लव्हस्टोरी देखील इंटरेस्टिंग आहेत. तर आज आपण रोहित शर्मा आणि रितिकाच्या फिल्मी लव्हस्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत.

टीम इंडियाचा हिटमॅन आणि कर्णधार रोहित शर्माचा आज (30 एप्रिल) 36 वा वाढदिवस आहे. रोहित शर्माने त्याच्या अफलातून खेळीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. रोहित तर सर्वांचा आवडता आहेच पण सोबत त्याची आणि रितीकाची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच आवडते.  रोहित आणि रितिकाची प्रेमकहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षाही कमी नाहीये. तब्बल सहा वर्षे डेट केल्यानंतर रोहितने रितिकाला एका खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यांच्ी हटके लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का?

रोहित- रितिका यांची पहिली भेट कुठे अन् कशी झाली?

रोहित आणि रितिका यांची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. रितिका ही एक स्पोर्ट्स मॅनेजर होती. त्यादरम्यान तिची भेट रोहितशी एका जाहिरातीच्या शूटमध्ये झाली. सुरुवातीला रितिकाला रोहित फारसा आवडला नव्हता. पण त्यानंतर सतत भेटल्यानंतर दोघांची मैत्री झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. विशेष सांगायचं झालं तर रितिका ही युवराज सिंगची चुलत बहीण आहे आणि युवीने त्यावेळी रोहितलाही रितिकापासून दूर राहण्याची वॉर्निंग देखील दिली होती.

रोहितने खास पद्धतीनं केलं होतं प्रपोज

रोहित आणि रितिका एकमेकांना सहा वर्ष डेट करत होते. त्यानंतर रोहितने रितिकाला एका खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यानंतर रोहित आणि रितिका यांनी त्यांचं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. पण  2015 मध्ये आयपीएल दरम्यान रितिका प्रसिद्धीच्या झोतात आली आणि त्यानंतर तिचे नाव रोहितसोबत जोडले जाऊ लागले. त्यानंतर रोहितने रितिकाला लग्नासाठी मागणी घातली होती

रोहितने रितिकाला प्रपोज करण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट किंवा परदेश दौऱ्यावर नेले नव्हतं. तर रितिकाला प्रपोज करण्यासाठी त्याने जिथून क्रिकेट करिअरला सुरुवात केली ते ठिकाण निवडले होते. बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहित रितिकाला घेऊन गेला होता. तिथे त्याने गुडघ्यावर बसून रितिकाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. रितिकाला रोहितच्या या प्लॅनबद्दल कसलीच कल्पना नव्हती. पण रोहितने प्रपोज करताच तिनेही लगेच होकार दिला.

2015 साली झालं लग्न

13 डिसेंबर 2015 रोजी रोहित शर्मा आणि रितिका विवाहबंधनात अडकले. दोघांचे लग्न मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पार पडलं. या दोघांच्या लग्नात क्रिकेटपासून ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबानं रोहित आणि रितिकाचं लग्न खास बनवण्यासाठी एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. तसंच आता  रोहित आणि रितिकाला एक क्यूट अशी मुलगी आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.