आला रे आला..! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोहित शर्माचा फॉर्म परतला, ठोकलं वेगवान शतक
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माचा जुना अंदाज दिसून आला आहे. रोहित शर्माने या सामन्यात जबरदस्त खेळी केली. मागच्या काही सामन्यात रोहित शर्मा एकेरी धावांवर बाद होत होता. पण रोहित शर्माने आता हे दुष्टचक्र मोडून टाकलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून चिंतेचा विषय होता. मागच्या 16 डावात रोहित शर्माच्या फलंदाजीतून फक्त एक अर्धशतक आलं होतं. त्यानंतर वारंवार फेल जात होता. एकेरी धावांवर तंबूत परतत असल्याने त्याच्या फॉर्मची चिंता क्रीडाप्रेमींना लागून होती. कर्णधार असल्याने त्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता. मात्र रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हे दृष्टचक्र मोडून काढलं आहे. रोहित शर्माचा आक्रमक अंदाज या सामन्यात पाहायला मिळाला. रोहित शर्मा टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देत होता. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाला चांगला फायदा झाला होता. आता त्याचा हा अंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. पण आता त्याची स्तुती होताना दिसत आहे. रोहित शर्माने 76 चेंडूत शतक पूर्ण केलं.
रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील तिसरी वेगवान अर्धशतकी खेळी राहिली. यापूर्वी त्याने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 27 चेंडूत, 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 29 चेंडूत, 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता इंग्लंडविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक म्हणजे 52 धावा ठोकल्या. रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दितलं हे 58वं अर्धशतक आहे. इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात 304 धावांची खेळी केली असून 305 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्मासह शुबमन गिलनेही अर्धशतक ठोकलं आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली.
रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप विजयानंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने शेवटचं अर्धशतक श्रीलंकेविरुद्ध 2024 मध्ये आलं होतं. त्यानंतर रोहित शर्मा न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळला. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही फेल गेला. रोहित शर्माचं अर्धशतकं 11 डावानंतर आलं आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.