AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!

रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने वनडे सामन्यात परतण्याची धडपड सुरु आहे. असं असताना आता थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. पण तत्पूर्वी रोहित शर्माने एक इच्छा व्यक्त केली आहे.

रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!
रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!Image Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2025 | 3:37 PM
Share

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट सामने खेळणार आहे. कारण टी20 आणि कसोटी संघातून त्याने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते त्याची खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे मालिका किंवा सामना झालेला नाही. बांगलादेशविरुद्धचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर ही प्रतीक्षा लांबली. टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत वनडे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. कारण अद्याप तो त्या पदावरून पायउतार झाला नाही. पण रोहित शर्माने या दौऱ्यापूर्वी एका मालिकेत भाग घेण्याची इच्छा वर्तवली आहे. ही मालिका कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध रोहित शर्माची खेळण्याची इच्छा

रेव्हस्पोर्ट्सच्या बातमीनुसार, रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी आस्ट्रेलिया ए विरूद्ध 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान अनऑफिशियल वनडे मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया ए टीम भारत ए विरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन वनडे साने खेळणार आहे. वनडे सामने कानपूरमध्ये होणार आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध तीन सामने खेळू इच्छित आहे. कारण या मालिकेतून त्याची चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रोहितला एकदिवसीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी डिसेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगू शकते. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. रोहित शर्मा आतापर्यंत 273 वनडे सामने खेळला आहे. त्याने 265 डावात 48.76 च्या सरासरीने 11168 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतकं आणि 58 अर्धशतकं ठोकली आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 264 इतकी आहे.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.