रोहित शर्माची दुखापत किती गंभीर? रुग्णालयात जाण्याची वेळ आल्याने मुंबईचं टेन्शन वाढलं!

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने विजयाने सुरूवात केली. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. असं असताना रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे.

रोहित शर्माची दुखापत किती गंभीर? रुग्णालयात जाण्याची वेळ आल्याने मुंबईचं टेन्शन वाढलं!
रोहित शर्माची दुखापत किती गंभीर? रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याने मुंबईचं टेन्शन वाढलं!
Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Apr 13, 2026 | 5:18 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वाधिक स्टार खेळाडू असलेला संघ कोणता असेल तर तो मुंबई इंडियन्स.. या संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह असे स्टार क्रिकेटपटू आहे. आयपीएल स्पर्धेत 13 वर्षानंतर पहिला सामना जिंकून मुंबईने सकारात्मक सुरूवात केली. पण त्यानंतर एका पाठोपाठ एक तीन पराभवाचे धक्के बसले. त्यामुळे मुंबई इंडियन्सची पूर्ण घडी विस्कटून गेली आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. असं असताना रोहित शर्माला यासाठी रुग्णालयात जावं लागणार आहे.

मुंबईचा चौथा सामना आरसीबीविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यातील पाचवं षटक टाकण्यासाठी कृणाल पांड्या आला होता. या षटकातील एक चेंडूवर धाव घेताना रोहित शर्माला पायाला दुखापत जाणवली. त्यानंतर सहाव्या षटकात पुन्हा एकदा त्रास जाणवू लागला. फिजिओने त्याची तपासणी केली आणि त्याला रिटायर हर्ट होत तंबूत परतावं लागलं. त्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीला उतरला नाही. रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सकडून कोणतेच अपडेट दिले गेले नाही. पण हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे खेळला नाह, असं सांगितलं गेलं. त्यामुळे या सामन्यात पुढे फलंदाजीला उतरला नाही.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माला रुग्णालयात जाऊन आपल्या हॅमस्ट्रिंगचं स्कॅनिंग करावं लागणार आहे. त्यानंतर त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज येईल. त्या रिपोर्टच्या आधारावर पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. आधीच मुंबई इंडियन्सवर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान आहे. त्यात रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहलाही विकेट मिळत नाही. त्यामुळे बलाढ्य मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील स्थिती नाजूक असल्याचं दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us