AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! बीसीसीआयने रोहित शर्माला का बोलावलं? नेमकं काय घडतंय?

रोहित शर्मा मैदानात पुन्हा कधी उतरणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. असं असताना बीसीसीआयने रोहित शर्माला बोलावणं धाडलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण असं अचानक बोलवण्याचं कारण काय? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला आहे.

मोठी अपडेट! बीसीसीआयने रोहित शर्माला का बोलावलं? नेमकं काय घडतंय?
मोठी अपडेट! बीसीसीआयने रोहित शर्माला का बोलावलं? नेमकं काय घडतंयImage Credit source: PTI
| Updated on: Aug 29, 2025 | 4:45 PM
Share

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. असं असताना दुसरीकडे बीसीसीआयच्या गोटात घडामोडी वेगाने घडत आहेत. कारण बीसीसीआयने रोहित शर्माला बोलावणं धाडलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट मैदानापासून दूर आहे. टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या रोहित शर्मा आराम करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अद्याप एकही वनडे सामना झालेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका खेळेल, अशी चर्चा आहे. तसेच संघाचं नेतृत्वही त्याच्याकडेच असण्याची शक्यता आहे. असं असताना रोहित शर्मा बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सलन्सला रिपोर्ट करणार आहे.

भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा 13 सप्टेंबरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे फिटनेस टेस्टसाठी हजर राहणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका सूत्राने सांगितलं की, सीओई 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान मुख्य मैदान (ए) वर दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीचं आयोजन करणार आहे. यासाठी रोहित शर्माची फिटनेस टेस्ट त्याच सुविधा असलेल्या वेगळ्या मैदानावर होईल. रोहित 13 सप्टेंबरपासून बीसीसीआय सीओई येथे फिटनेस टेस्टसाठी उपलब्ध असेल. येथे दोन ते तीन दिवस राहील. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी त्याची तयारी सुधारण्यासाठी सराव करेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहली भारत अ संघाकडून खेळतील

रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. यातील पहिला सामना 30 सप्टेंबरला होणार आहे. दुसरा सामना 3 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीची तयारी असणार आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत दोन्ही दिग्गज खेळाडूंना आपली तयारी करण्याची संधी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध मिळेल.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?