RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील सातवा सामना असणार आहे. दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकलेत? जाणून घ्या.

RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?
Virat Kohli and Shubman Gill RCB vs GT IPL
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Apr 24, 2026 | 1:53 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. ‘किंग कोहली’ अर्थात विराट कोहली आणि ‘प्रिन्स’ शुबमन गिल असा हा सामना असणार आहे. रजत पाटीदार आरसबीचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्या खांद्यावर गुजरातच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. गतविजेत्या आरसीबीने या मोसमात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र आरसीबीचा गेल्या सामन्यात पराभव झालाय. तसेच गुजरातलाही मुंबई विरुद्ध 99 धावांनी पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दोन्ही संघांसमोर विजय मिळवून पुन्हा ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील सातवा सामना असणार आहे. गुजरात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. तर गतविजेता आरसीबीने अपवाद वगळता उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे गुजरात आणि बंगळुरुपैकी कोण वरचढ ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना कधी?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना शुक्रवारी 24 एप्रिलला होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना कुठे?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु इथे होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहायला मिळेल.

दोन्ही संघ तुल्यबल

दरम्यान बंगळुरु आणि गुजरात यांच्या शुक्रवारी 24 एप्रिलला होणारा एकूण सातवा सामना होणार आहे. आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. आररसीबी विरुद्द गुजरात यांत्यात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 3 सामने गुजरातने जिंकले आहेत. तर आरसीबीने 3 वेळा विजय मिळवून गुजरातचा हिशोब करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात आणि बंगळुरुपैरकी कोणता संघ सामना जिंकून 4-3 अशी आघाडी घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us