AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबी सुस्साट, सलग पाचवा विजय, गुजरातचा 61 धावांनी धुव्वा, प्लेऑफमध्ये धडक

Gujarat Giants Women vs Royal Challengers Bengaluru Women Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमनंतर बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्येही विजयी घोडदौड कायम राखत चौथ्या मोसमातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

WPL 2026 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबी सुस्साट, सलग पाचवा विजय, गुजरातचा 61 धावांनी धुव्वा, प्लेऑफमध्ये धडक
RcbW Smriti Mandhan WPL 2026Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2026 | 1:58 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमात (WPL 2026) आपला विजयी धमाका कायम ठेवला आहे. आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात 19 जानेवारीला सलग आणि एकूण पाचवा विजय मिळवला आहे. आरसीबीने बडोद्यातील कोटांबीमधील बीसीए स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्स वूमन टीमवर 61 धावांनी मात केली आहे. आरसीबीने गुजरातसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातने या विजयी धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. गुजरातला आरसीबीसमोर 20 ओव्हरमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. गुजरातने 8 विकेट्स गमावून 117 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे हा सामना जिंकला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरलीय.

आरसीबीचा विजयी पंच

आरसीबीने या विजयासह या मोसमातील आपला सलग पाचवा तर गुजरात जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय मिळवला. आरसीबीने याआधी गुजरात जायंट्सवर 16 जानेवारीला चौथ्या मोसमातील नवव्या सामन्यात 32 धावांनी मात केली होती. त्यामुळे गुजरातकडे सोमवारी 19 जानेवारीला गेल्या पराभवातील परतफेड करण्याची संधी होती. मात्र आरसीबीने पुन्हा गुजरातला पराभवाची धुळ चारली.

सामन्यात काय झालं?

आरसीबीने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातची कर्णधार एश्ले गार्डनर हीचा अपवाद वगळता इतर कुणालाही 20 पार मजल मारता आली नाही. सोफी डीव्हाईन आणि कनिका आहुजा या दोघी आल्या तशाच झिरोवर आऊट होऊन माघारी गेल्या. ओपनर बेथ मुनी, काश्वी गौतम आणि जॉर्जिया वॉरहम या तिघी दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत.

अनुष्का शर्मा 18, भारती फुलमाळी 14 आणि तनुजा कंवर हीने 11 धावांची खेळी केली. गार्डनरने सर्वाधिक धावा केल्या. गार्डनरने 43 बॉलमध्ये 54 रन्सची खेळी केली. मात्र इतरांनी गडघे टेकल्याने गुजरातला पराभूत व्हावं लागलं. आरसीबीसाठी सायली सातघरे हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नॅडीन डी क्लर्क हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर लॉरेन बेल, राधा यादव आणि श्रेयांका पाटील या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

आरसीबीची बॅटिंग

त्याआधी गुजरातने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. आरसीबीसाठी गौतमी नाईक हीने सर्वाधिक 73 धावा केल्या. कर्णधार स्मृती मंधाना हीने 26 आणि ऋचा घोष हीने 27 धावांचं योगदान दिलं. तर राधा यादव हीने अखेरच्या क्षणी 17 धावा जोडल्या. त्या व्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरातकडून काश्वी गौतम आणि एश्ले गार्डनर या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सोफी डीव्हाईन आणि रेणुका सिंह ठाकुर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

आरसीबी अव्वल स्थानी कायम

आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम राखला. आरसीबीच्या या सलग पाचव्या विजयासह त्यांच्या खात्यात 10 पॉइंट्स झाले आहेत. तसेच आरसीबाचा नेट रनरेट हा +1.882 इतका झाला आहे. हा नेट रनरेट या सामन्याआधी +1.600 असा होता.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.