
आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज रविवारी 18 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 59 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स भिडणार आहेत. राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात अर्थात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबचं तर संजू सॅमसनकडे राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सामन्याला थोड्याच वेळात 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. पंजाबच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सने या सामन्यात एकूण 2 बदल केले आहेत. संजू सॅमसन याची एन्ट्री झाल्याने नितीश राणा याला बाहेर बसावं लागलं आहे. तर जोफ्रा आर्चर याच्या जागी क्वेन माफाका याला संधी देण्यात आली आहे.
राजस्थान विरुद्ध पंजाब या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी उभयसंघात 5 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा राजस्थानने पंजाबवर 50 धावांनी मात केली होती. त्यामुळे आता पंजाब या पराभवाची परतफेड करुन प्लेऑफचं तिकीट मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकल्यास थेट आरसीबीला फायदा होणार आहे. राजस्थान विजयी होताच तिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरेल. त्यामुळे राजस्थान विरुद्ध पंजाब सामना फार महत्त्वाचा आहे.
पंजाब टॉसचा बॉस
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bat against @rajasthanroyals
Updates ▶️ https://t.co/HTpvGew6ef #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/IHU5EGRfAK
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, आकाश मढवाल आणि फजलहक फारूकी
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.