Live सामन्यात घडला अपघात! झेल पकडताना स्टँडवरून मुलगा पडला मुलीवर आणि पँट उतरली Watch Video

दक्षिण अफ्रिका टी20 लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात सामना रंगला. हा सामना एमआय केपटाऊनने जिंकला आणि जेतेपद पटकावलं. पण या सामन्यात झेल पकडताना एक अपघात घडला. झेल पकडण्याच्या नादात एक मुलगा वरुन खाली पडला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Live सामन्यात घडला अपघात! झेल पकडताना स्टँडवरून मुलगा पडला मुलीवर आणि पँट उतरली Watch Video
| Updated on: Feb 09, 2025 | 2:29 PM

दक्षिण अफ्रिका टी20 लीग स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स ईस्टर्न केप आमनेसामने आले होते. हा सामना एमआय केपटाऊनने 76 धावांनी जिंकत जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल एमआय केपटाऊन यांनी जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. एमआय केपटाऊनने 20 षटकात 8 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं. पण सनरायझर्स ईस्टर्न केप संघ 18.4 षटकात 105 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार ट्रेन्ट बोल्ट याला मिळाला. ट्रेंट बोल्टने 4 षटकात फक्त 9 धावा देत 2 गडी बाद केले. एमआय केपटाऊन्सच्या डावात एक विचित्र प्रकार घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या सामन्यात स्टँडमध्ये बसलेला तरूण झेल पकडण्यासाठी प्रयत्नशील होता. पण झेल पकडण्याच्या नादात वरून थेट मुलीच्या अंगावर पडला. इतकंच नाही तर त्याची पँटसुद्धा खाली उतरली. ही दृष्य पाहून समालोचकानाही हसू आवरलं नाही. वेगवेगळ्या अँगलने हा व्हिडीओ असल्याने नेटकरही मजा घेत आहेत.

एमआय केपटाईन नाणेफेक जिंकून फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. या सामन्यात एक षटकात थेट प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये गेला. तेव्हा एक फॅनने काहीही करून झेल पकडायचा असा मानस केला. पण चेंडू त्याच्यापासून दूर होता. तरीही त्याने प्रयत्न केला आणि त्याचा तोल गेला. वरून थेट तो त्या मुलीवर पडला. पुढे घसरत गेल्यानंतर त्याची पँटही उतरली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स ईस्टर्न केप (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झोर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, जॉर्डन हर्मन, एडेन मार्कराम (कर्णधार), टॉम अबेल, ट्रिस्टन स्टब्स (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, क्रेग ओव्हरटन, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, अँडिले सिमलेन.

एमआय केप टाऊन (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, रीझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉनर एस्टरहुइझेन, जॉर्ज लिंडे, डेलानो पॉटगिएटर, कॉर्बिन बॉश, रशीद खान (कर्णधार), कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट.