AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NZ : दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पुन्हा चोकर्स, शेवटच्या 6 चेंडूत झालं असं की…

झिम्बाब्वे टी20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 3 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दक्षिण अफ्रिका सहज जिंकेल असं वाटत होतं, पण...

SA vs NZ : दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पुन्हा चोकर्स, शेवटच्या 6 चेंडूत झालं असं की...
दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पुन्हा चोकर्स, शेवटच्या 6 चेंडूत झालं असं की...Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Jul 26, 2025 | 9:56 PM
Share

झिम्बाब्वे टी20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 6 गडी गमवून 177 धावा करू शकला. शेवटच्या षटकात दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 7 धावांची गरज होती. तसेच हातात सहा विकेट होत्या. जॉर्ज लिंडे आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानात होती. मॅट हेन्री शेवटचं षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूचा सामना करता ब्रेव्हिसने निर्धाव घालवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फटका मारला पण झेल बाद होत तंबूत परतला. त्यामुळे चार चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली.

कॉर्बिन बॉश मैदानात आला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यामुळे स्ट्राईक जॉर्ज लिंडेला स्ट्राईक मिळाली. चौथ्या चेंडूवर कॉर्बिनने एक धाव घेतली आणि जॉर्ज लिंडेला स्ट्राईक दिली. त्यामुळे दोन चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. पण पाचव्या चेंडूवर लिंडे झेलबाद झाला. त्यामुळे 1 चेंडू आणि चार धावा अशा स्थितीत सामना आला. शेवटच्या चेंडूवर मुथूसामी स्ट्राईकला होता. पण त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडकडे गेला. अवघ्या तीन धावांनी दक्षिण अफ्रिकेने हा सामना गमावला.

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन याने सांगितलं की, ‘आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही खूप चांगला खेळ केला. हा मिलिमीटरचा खेळ आहे. आणखी एक सेंटीमीटर हवा होता आणि निकाल कोण ठरवेल हे कोणाला माहिती. संपूर्ण मालिका काहीतरी करून पाहण्याबद्दल आणि थोडे प्रयोग करण्याबद्दल होती, खेळाडूंनी पदार्पण केले, आज आम्ही आमच्या सर्वात मजबूत संघाविरुद्ध खेळलो. एक चांगला आणि अनुभवी संघ आहेत. आम्ही यातून खूप काही शिकणार आहोत आणि जाणार आहोत. सर्वांनी योगदान दिले आहे, विशेषतः तरुण खेळाडू. आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि गेल्या काही आठवड्यात आम्ही एक संघ पुढे जात आहोत.’

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.