
दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या पाकिस्तान क्रिकेट टीमला पहिल्या टी 20I सामन्यात विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलर याच्या 82 आणि जॉर्ज लिंडे याने केलेल्या 48 धावांच्या मदतीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 183 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेची वाईट सुरुवात झाली होती. मात्र मधल्या फळीत मिलर आणि त्यानंतर शेवटपर्यंत लिंडेने स्फोटक खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला 180 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
मिलर आणि लिंडे या दोघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेसाठी काही खास करता आलं नाही. मिलरने 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. तर लिंडेने 24 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह 48 रन्स करत फिनिशिंग टच दिला. क्वेना मफाका आणि कॅप्टन हेन्रिक क्लासेन या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. पाकिस्तानकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी चौघांना विकेट्स मिळाल्या. तर एकटा हॅरीस रौफ विकेट घेण्यात अपयशी ठरला. शाहीन अफ्रीदी आणि अब्रार अहमद या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर अब्बास अफ्रिदी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सुफीयान मुकीम याने 1 विकेट मिळवली.
कोण करणार विजयी सुरुवात?
🔄 | Change of Innings
A cracker of a 1st innings from both teams!👏💥
🇿🇦South Africa post 183/9 in their 20 overs.
🇵🇰Pakistan will need to chase 184 to win.#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/StTxOBsUYj— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : हेनरिक क्लासेन,(कर्णधार आणि विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, अँडिले सिमेलेन, न्काबायोमझी पीटर, क्वेना माफाका आणि ओटनील बार्टमन.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), बाबर आझम, सैम अयुब, उस्मान खान, तय्यब ताहिर, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद.