David Miller : 6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4, मिलरची विस्फोटक खेळी, थोडक्यात शतक हुकलं, पण बेक्कार धुतलं
South Africa vs Pakistan 1st T20i : दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने तडाखेदार खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मिलरचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं, मात्र त्याने टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याने पाकिस्तानविरूद्धच्या टी 20i मालिकेत जबरदस्त आणि तडाखेदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हेन्रिक क्लासेन याने नाणेफेक जिंकून फलंदाजाची निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात झाली.पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याला भोपळाही फोडता आला नाही. मॅथ्यू ब्रेट्झके आणि रिझा हेंड्रीक्स या दोघांनी प्रत्येकी 8-8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 28 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर मिलरने फटकेबाजी सुरु केली आणि दक्षिण आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
मिलरने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 28 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. मिलरने सलग 2 षटकार खेचून अर्धशतक पू्र्ण केलं. मिलरने 192.86 च्या स्ट्राईक रेटने 5 सिक्स आणि 3 फोरसह 54 धावा केल्या. मिलर ज्या वेगाने खेळत होता, त्यानुसार तो शतक करणार हे निश्चित वाटत होतं. मिलरने अर्धशतकानंतर आणखी रौद्र रुप धारण केलं गोलंदाजांची धुलाई करायला लागला. मात्र या फटकेबाजीत मिलर आऊट झाला.
मिलरचं शतक अवघ्या 18 धावांनी हुकलं. मात्र मिलरने त्याच्या 82 धावांच्या खेळीसह दक्षिण आफ्रिकेला भक्कम स्थितीत आणून ठेवलं. मिलरला इरफान खान याने आऊट केलं. मिलरने 205 च्या स्ट्राईक रेटने 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 82 धावा ठोकल्या.
किलर मिलरची तोडफोड खेळी
WHAT A KNOCK, DAVID MILLER 🙇
– 82 runs from just 40 balls when South Africa was down & out, the 2nd best score has been just 17 runs so far, the one man army in the innings so far, Miller 🫡 pic.twitter.com/E3fiQsSKl1
— Johns. (@CricCrazyJohns) December 10, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : हेनरिक क्लासेन,(कर्णधार आणि विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, अँडिले सिमेलेन, न्काबायोमझी पीटर, क्वेना माफाका आणि ओटनील बार्टमन.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), बाबर आझम, सैम अयुब, उस्मान खान, तय्यब ताहिर, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद.
