RCB च्या स्टार बॅट्समनची धुवाधार बॅटिंग, 7 फोर, 4 SIX, IPL टीम्ससाठी धोक्याची घंटा

IPL 2023 चा सीजन सुरु होण्यासाठी दोन महिने उरले आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे अनेक स्टार प्लेयर्स सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 लीगचा भाग आहेत. तिथे ते आपला जलवा दाखवतायत.

RCB च्या स्टार बॅट्समनची धुवाधार बॅटिंग, 7 फोर, 4 SIX, IPL टीम्ससाठी धोक्याची घंटा
Sa20 leagueImage Credit source: twitter/Sa20
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 10:05 AM

डरबन – IPL 2023 चा सीजन सुरु होण्यासाठी दोन महिने उरले आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे अनेक स्टार प्लेयर्स सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 लीगचा भाग आहेत. तिथे ते आपला जलवा दाखवतायत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी त्यापैकीच एक आहे. सध्या त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. फाफ डुप्लेसी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन आहे. हा दिग्गज बॅट्समन दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये जोबर्ग सुपर किंग्सकडून खेळतोय. त्याने पुन्हा एकदा धुवाधार बॅटिंग करुन IPL आधी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.

थोडक्यात हुकली शतकाची संधी

डुप्लेसीने रविवारी 5 फेब्रुवारीला सनरायजर्स ईस्टर्न कॅप विरुद्ध 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. टुर्नामेंटमधील दुसर शतक झळकवण्याची त्याची संधी थोडक्यात हुकली. डुप्लेसीने 61 चेंडूत 92 धावा कुटल्या. तो 19 व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर आऊट झाला.

डरबन सुपर जायंट्स विरुद्ध शतक

जोबर्गचा कॅप्टन डुप्लेसीकडे सलग दुसरी सेंच्युरी झळकवण्याची संधी होती. मागच्या सामन्यात तो डरबन सुपर जायंट्स विरुद्ध 113 धावांची इनिंग खेळला होता. या टुर्नामेंटमधील त्याचं ते एकमेव शतक आहे. टीमचे अन्य बॅट्समन फ्लॉप

डुप्लेसीशिवाय त्याच्या टीमचे अन्य बॅट्समन फ्लॉप ठरले. डुप्लेसीने ओपनिंग पार्टनर रीजा हेंड्रिक्ससोबत (40) मिळून 119 धावांची भागीदारी केली. पण अन्य 6 बॅट्समन दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. टीमने फक्त 160 धावा केल्या.

पहिलं शतक झळकवताना मेहुण्याची धुलाई

डुप्लेसी SA 20 लीगमध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. पहिल्या शतकाची स्क्रिप्ट रचताना त्याने आपल्या मेहुण्याची जोरदार धुलाई केली होती. या मॅचमध्ये डुप्लेसी आणि त्याचा मेहुणा परस्परविरोधी टीममध्ये खेळत होते. जेव्हा तो गोलंदाजी करायला आला, तेव्हा डुप्लेसीने त्याला खूप वाईट पद्धतीने धुतलं. जोबर्ग सुपर किंग्स आणि डरबन सुपर जायंट्समध्ये सामना होता. डुप्लेसी जोबर्ग सुपर किंग्सकडून खेळत होता. हार्ड्स विल्जोन डरबन सुपर जायंट्सकडून खेळत होता. विल्जोनची बहिण डुप्लेसीची पत्नी आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.